घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Live Update: मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Subscribe

मुंबईत वांद्रे पोलिसांना निनावी फोन करण्यात आला. निनावी फोन कॉलमधून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत मलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. मिलिंद तेलतुंबडे हा देशातील सर्वात मोठा नक्षली कमांडर आहे. मिलिंद तेलतुंबडेवर ५० लाखांचे बक्षीस लागले आहे.


राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी जनतेला शांततेचं आवाहन केले आहे. आपलं भविष्य अंधारात जाईल असं वागू नका, राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखा असं आवाहन ही त्यांनी केलंय.

- Advertisement -

अमरावतीमधील हिंसाचार प्रकरणी पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक


 

राज्यात गेल्या २४ तासात ९९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत.त्याचप्रमाणे ४९ रुग्णांचा आज राज्यात मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १२,२१९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


 

मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शुक्रवार पर्यंत मुंबईत पहिला डोस घेतलेले ९९.९९ टक्के लोक होते. आज १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ कर्माचाऱ्यांशी चर्चा करुन संपावर निर्णय घेतील – अनिल परब


विलिनीकरणाची मागणी मान्य करू शकत नाही. आयोगाने विलिनीकरणाची शिफारस केल्यास त्याचा सकारात्मक विचार करु – अनिल परब


 

अमरावती, नांदेड मधील घटना दुर्दैवी आहेत. अफवांच्या आधाराने राज्यात जर कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना शासन करण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. दोन्ही समाजाने सुसंवाद आणि शांतता राखावी, असे पार्थ पवार म्हणाले.


खंडणी प्रकरणात निलंबित पोलीस अधिकार सचिन वाझेला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी


महाराष्ट्रातील होणाऱ्या हिंसाचारासंदर्भात काही वेळापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.


वाढत्या महागाई विरोधातील आणि केंद्र सरकार विरोधातील शिवसेनेच्या औरंगाबादमधील आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या आक्रोश मोर्चामध्ये खासदार संजय राऊतांसोबत आणि शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थितीत आहे. या मोर्चादरम्यान संजय राऊतांचं एक भाषण होणार आहे. क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत शिवसेनेचा हा भव्य आक्रोश मोर्चा असणार आहे.


इंधनापासून ते जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. याच महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाने येत्या १४ नोव्हेंबर पासून #जन_जागरण_अभियान हाती घेतले असून आपणही या अभियानात नक्कीच सहभागी व्हा, असे आवाहान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार


नागरिकांनी शांतता राखावी. आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नव्हती. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल. – दिलीप वळसे पाटील


महाराष्ट्रात होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात हिंसाचाराला थारा नाही! परंतु त्रिपुरातील कथित घटनेवरून नांदेड,मालेगाव, अमरावतीत हिंसाचार झाला तरी राज्य सरकार झोपलेलेच! अशा हिंसक आंदोलकांना मोर्चाची परवानगी मिळतेच कशीविनाकारण अस्थिरता पसरवणाऱ्यांना कोणाची चिथावणी होती का? याची राज्याचे गृहमंत्री @Dwalsepati यांनी चौकशी करावी.’


त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र अमरावती बंदला पुन्हा हिंसक वळण आले आहे. येथे मोठ्याप्रमाणात हिंसाचार आंदोलनकर्त्यांकडून होत असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकसुद्धा होत आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर बैठक होणार आहे. एसटी संपावर तोडगा काढण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत ठिक नाही. ईडीचे अधिकारी त्यांच्याशी नीट वागत नाही, त्याच्यावर दबाव आणला जातोय. अशा प्रकारे कोणतीही तपास यंत्रणा काम करत नाही. भाजपचे सुद्धा अनेक प्रकार आणि अनेक विषय समोर आले आहेत. त्यांचे पत्ते जर ईडीला माहित नसतील, जयंत पाटील म्हटले आहेत, ईडीला जाऊन भेटणार आहोत. देशमुखांची तब्येत बरी नसले तर त्यांना रुग्णालयात हलवणे योग्य आहे. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले आहेत, तो व्यक्ती पळून गेला आहे. आरोप करणाऱ्या व्यक्तीने आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे, तरी ईडी अशाप्रकारे छळ करत असेल, तर त्याच्यामागे नक्कीचं काहीतरी कारस्थान आहे – संजय राऊत


आज महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट नवनिर्माण सेनेची बॅनरबाजी सुरू झाली आहे. औरंगाबादच्या अमरप्रित चौकात मनसेनेने शिवसेनेच्या विरोधात बॅनर झळकावले आहेत. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण’ अशा आशयाच्या बॅनरमधून शिवसेनेवर मनसेने खोचक टिका केली आहे.


औरंगाबादमध्ये आज महागाई विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. तसेच मनसेसुद्धा प्रतिमोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.


अजूनही एसटी कामगाराचा संप मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. आज एसटी कामगाऱ्यांच्या संपाचा सहा दिवस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -