घरताज्या घडामोडीCorona Lockdown Effect: ६ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे!

Corona Lockdown Effect: ६ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे!

Subscribe

लॉकडाऊनमुळे लोकांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी ईपीएफमधून पैसे काढत आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. लॉकडाऊनदरम्यान कंपनी बंद असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे ६ लाख ५० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना ईपीएफ (Employess probident fund) मधून पैसे काढावे लागले आहेत. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात दररोज सरासरी ३० हजार ते ३५ हजार लोकांनी त्यांच्या ईपीएफ मधून पैसे काढले आहेत. यामुळे लोक किती संकटात आहेत हे दिसून येत आहे.

ईपीएफओ (Employess probident fund orgnisation)च्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या काळात ईपीएफमधून २ हजार ७०० कोटी काढले गेले आहेत.

- Advertisement -

एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, यामध्ये ईपीएफओ अंतर्गत सेवानिवृत्त निधीमधून थेट काढलेला पैसा आणि कंपनीच्या पीएफ ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केलेल्या पैशांचा समावेश आहे. पैस काढण्यात फक्त छोट्या कंपन्यातील कर्मचारी नाहीत तर मोठ्या कंपन्यातील कर्मचारी देखील आहेत.

उदाहरणार्थ, कुद्दलोरेमधील नेवेली लिग्राइट कॉर्पोरेसनमधील कर्मचाऱ्यांनी ८४.४ कोटी रुपये, विजाग मधील विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी ४०.९ कोटी आणि एनटीपीसी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी २८ कोटी ईपीएफ मधून पैसे काढले.

- Advertisement -

अधिकाऱ्याने सांगितलं की, उत्पन्नात नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकांना उत्त्पन्नाची मोठी समस्या आहे. आम्ही विचार देखील केला नव्हता की इतके सारे लोक नवीन नियमांनुसार पैसे काढतील. आपण पाहता असलेला हा कल फक्त एक राज्य किंवा काही औद्योगिक ठिकाणी मर्यादित नाही आहे. सर्व राज्य आणि क्षेत्रात असा प्रकार आहे. अहवालानुसार येत्या १० दिवसांत किमान १० लाख लोक ईपीएफमधून पैसे काढणे अपेक्षित आहे.


हेही वाचा – वाडियातील परिचारिका पॉझिटिव्ह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -