CoronaVirus: मोदीजी तुम्ही सांगा आम्ही कोरोनाशी लढू की उपासमारीशी…

उत्तर प्रदेश आणि बिहार मधील मजूर कर्नाटकमध्ये अडकले आहे. या मजुरांवर उपासमारीशी सामना करण्याची वेळ आहे.

corona lockdown labourers from up bihar stranded in karnataka seek help
CoronaVirus: मोदीजी तुम्ही सांगा आम्ही कोरोनाशी लढू की उपासमारीशी...

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊन दरम्यान अनेक मजूर विविध राज्यात अडकले आहेत. कर्नाटकमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रार्थना केली आहे. मजूर म्हणाले की, माननीय पंतप्रधानांजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व लोक लॉकडाऊनचे पालन करत आहोत. आज लॉकडाऊनला एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. आमची काम बंद आहेत. जे काही पैस होते त्यातून रेशन घेऊन खाऊन झाले. लॉकडाऊनमध्ये कोरोना ऐवजी भुकमारीमुळे मरून जाऊ असं दिसत आहे. आता तुम्ही सांगा आम्ही कोरोनाशी लढू की उपासमारीशी.

द वायर हिंदीच्या वृत्तानुसार, एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मजूर म्हणाले की, सरकारच्या लोकांना विनंती करतो की, आमच्यासारख्या लोकांना आपापल्या गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करा. आम्हाला आपापल्या घरी आणि कुटुंबात जायचे आहे. जय हिंद, जय वंदे मातरम, अशा प्रकारे कर्नाटकातील शिमोग जिल्हातील हल्लून गावात अडकलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधील ३४ मजुरांचा व्हिडिओ समोर आला आहे. या मजुरांनी आपल्या गावाचे प्रमुख आणि खासदार यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवला आहे.

भद्रा नदीतून वाळू काढण्याचे काम हे मजूर करत होते. हे सगळे मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. या मजुरांना एक ट्रॉली वाळू टाकल्यावर १ हजार १५० रुपये मिळतात. एका ट्रॉलीत १०० घनफुट वाळू असते.

एका मजुराने सांगितले की, त्यांना रेशन आणण्यासाठी दीड किलोमीटर जावे लागते. रेशन आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी तीन तास सुरू असतात. यादरम्यान त्यांना सामान आणण्यासाठी जावे लागते. त्यांना कोणत्याही प्रकारची सरकारकडून मदत मिळत नाही आहे आणि पैसे संपत आहेत. मजुरांना जेवणासह इंधनाची देखील कमतरता आहे. ते आजूबाजूच्या नारळ आणि सुपारीच्या झाडांचे सुकलेली पान आणि लाकड एकत्र करून जेवण तयार करतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. नदीतले पाणी वाढत आहे. तसंच भाषेअभावी स्थानिक लोकांशी आपली समस्या सांगू शकत नाही आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळत नसल्याचे मजुराने सांगितले.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मृत्यू, जाणून घ्या सत्य