घरCORONA UPDATELockdown: 'या' क्षेत्रातल्या नोकऱ्यांना धोका, पण वर्क फ्रॉम होम संस्कृती रुजणार!

Lockdown: ‘या’ क्षेत्रातल्या नोकऱ्यांना धोका, पण वर्क फ्रॉम होम संस्कृती रुजणार!

Subscribe

देशभरात सध्या लॉकडाऊमुळे जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व जणांवर घरीच बसण्याची वेळ आली आहे. एक तर यातल्या बऱ्याच जणांना सक्तीने सुट्टी द्यावी लागली आहे, किंवा अनेक कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करून घ्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीव हा लॉकडाऊन नक्की किती काळ चालणार? याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? कोणत्या क्षेत्राला याची झळ बसणार? नोकऱ्यांवर गदा तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न देशातल्या कर्मचारी वर्गाच्या मनात निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसेल, याविषयी नॅस्कॉमचे माजी अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी सूचोवाच केले आहेत. न्यूज १८ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या जाणार!

चंद्रशेखर यांच्यामते लॉकडाऊन दीर्घकाळ चालला, तर आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या जाऊ शकतात. सध्या सर्वाधिक आयटी कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्याचा दीर्घ काळात वेगळी कार्यसंस्कृती म्हणून या कंपन्यांना आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार असला, तरी नजीकच्या भविष्यकाळात या क्षेत्रात नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. विशेषत: या क्षेत्रात काम करणाऱ्या इंटर्न अर्थात शिकाऊ कामगारांच्या इंटर्नशिप जाऊ शकतात. दोनच गोष्टींसाठी कंपन्या नोकऱ्या कमी करणार नाहीत. एक तर त्यांना त्यांचे कर्मचारी घालवू द्यायचे नसतील, किंवा त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैशांची कमी नसेल. साधारणपणे ३ महिन्यांपर्यंत देशातल्या आयटी कंपन्या आर्थिक ताण सहन करू शकतील. त्यानंतर या कंपन्या कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदे देऊ शकणार नाहीत, असं देखील चंद्रशेखर म्हणाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

- Advertisement -

वर्क फ्रॉम होम दीर्घकाळात फायदेशीर!

दरम्यान, नोकऱ्या जाण्याची जरी भिती असली, तरी दीर्घकाळात आयटी क्षेत्रामध्ये वर्क फ्रॉम होम कार्यसंस्कृती रुजू होऊ शकते. यामध्ये कर्मचाऱ्यांची उत्पादकता, कमीत कमी लॉजिस्टिक्स आणि कार्यालय जागेची अनावश्यकता या गोष्टी कारणीभूत ठरू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -