Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये दाखल

Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये दाखल

Related Story

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या विमानतळावर दाखल झाले.


- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासांत ७३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख २१ हजार ३७०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार २९८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ८८ हजार ९९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.


गोव्यात गेल्या २४ तासांत २०७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गोव्यात ३ हजार २६८ जणांवर उपचार सुरू आहेत.


आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने उद्या सकाळी साडेसहा वाजता सातव्या योगा दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे.


युतीबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतात- एकनाथ शिंदे


मुंबईत उद्यापासून पूर्व नोंदणीशिवाय मिळणार लस, रिक्षा चालक, फेरीवाल्यांना प्राधान्याने मिळणार लस, प्रत्येक वॉर्डात दोन लसीकरण केंद्र, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.


गेल्या 24 तासांत 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1576 बाधितांनी जीव गमावला आहे. तर काल दिवसभरात 87,619 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे, कळलं नाही, पण जेव्हा स्पष्टपणा दिसेल तेव्हा उत्तर देऊ, स्वबळाची भाषा करणं प्रत्येकाचा हक्क- नाना पटोले


कुडळमध्ये बेकायदा जमाव जमल्याप्रकरणी आणि राडा प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे


मराठा आरक्षण मुद्द्यावर छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत उद्या नाशिकमध्ये मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची तयारी सुरु असून काळे शर्ट,काळी पॅन्ट,काळी टोपी घालून निषेध नोंदवणार जाणार आहे. सकल मराठा समाजाने आंदोलनात सहभागी होण्याच आवाहन केले आहे.


 

- Advertisement -