Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Live Update: राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ नव्या रुग्णांची नोंद तर १८ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

२४ तासात बाधित रुग्ण – ७३३ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ७३२ बरे झालेले एकूण रुग्ण – ६८२६७८ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५% एकूण सक्रिय रुग्ण- १५७९८ दुप्पटीचा दर- ६३३ दिवस कोविड वाढीचा दर ( ५ जून ते ११ जून)- ०.११ %


संभाजीराजेंची औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदेंच्या स्मारकाला भेट


- Advertisement -

मुंबईतील पवई तलाव भरुन वाहू लागला

मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे पवाई तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. अखेर तलावाचे पाणी भरुन वाहू लागले आहे.


संभाजी राजेंच नेतृत्त्व मान्य करण्यास काही अडचण नाही. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्यासाठी ठाकरे सरकारने जेवढी ताकद लावली तेवढी ताकद आरक्षणासाठी ताकद लावली नाही- चंद्रकांत पाटील


पावसामुळे कोलमडलेली रेल्वेवाहतूक पूर्वपदावर, कुर्ला ते सायन आणि सायन ते दादर वाहतूक सेवा हळूहळू होतेय सुरु


वडाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठी वाहतुक कोंडी, नानासाहेब फडणवीस ब्रिजजवळ वाहनांच्या मोठ्या रांगा, पावसाने घेतली उसंती.


कोपर्डीप्रकरणी सहा महिन्यांत निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करा, राज्य सरकारकडे खासदार संभाजीराजेंची मागणी


मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, दादर, हिंदमाता परिसर जलमय, जुहू, मारवे समुद्र किनारपट्टी भागात उसळल्या लांबच लांब लाट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रीय मंत्र्यासोबर आज महत्वपूर्ण बैठक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रीय मंत्र्यासोबर आज महत्वपूर्ण बैठक,  केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा घेणार आढावा, मंत्री मंडळात फेरबदल होण्याची शक्यता


येत्या ४ तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अतिवृष्ठीचा इशारा, तर सिंधुदुर्गात ढगफुटी

गेल्या काही तासांपासून मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले असून येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर सिंधुदुर्गात ढगफुटी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


 

- Advertisement -