Live Update: मालाड दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू, १९ जण जखमी

live update

मालाड दुर्घटनेत एकूण १९ जण जखमी झालेत, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू  झाला आहे. ढिगाऱ्यामधून आणखीन एकाचा म्हणजे १२वा मृतदेह आज सायंकाळी काढण्यात आला. मृत व्यक्ती 60 वर्षीय पुरुष असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली आहे.


मालाड, मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घराच्या पडझडीत ११ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दहिसर ( पूर्व) येथील शंकर मंदिरटेकडीजवळील चाळीतील तीन घरांची पडझड होऊन त्यामध्ये प्रद्युम्न सरोज (२६) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत ७ -८ जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवले. (सविस्तर वाचा ) 


राज्यात गेल्या २४ तासात १२,२०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा )


 

मुंबईत आज ६६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ८११ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. आज,गुरुवारी मुंबईत २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा ) 


भांडुप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्‍यामुळे दोन महिला त्‍यात पडताना वाचल्‍याची घटना घडली. या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतेने दखल घेऊन आज भांडूप गावातील संबंधित घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आधुनिक कुलूपबंद  पद्धतीने मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व मॅनहोलची झाकणे बसविण्यात यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर  किशोरी किशोर पेडणेकर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड केंद्रांसह रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा होत राहील, याची खबरदारी घेण्याबरोबरच अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


गोव्यात गेल्या २४ तासात ४१३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५८५ रुग्णांना कोरोनावर मात केलीय. गोव्यात गेल्या २४ तासात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.


मुंबईत मालवणी येथे तीन मजली ईमारत बाजूच्या दुमजली घरांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 8 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना मुंबई मनपा ने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.


मुंबईला मुसळधार पावसामुळे अवघ्या १२ तासात ‘मुंबईची तुंबई’ होऊन नागरिकांचे हाल झाल्यानंतर आता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, शहर व उपनगरातील सर्वत्रच्या ‘मॅनहोल’ची पुन्हा एकदा झाडाझडती घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.


राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजेंनी सर्व नेत्यांची भेट घेतली होती पण उदयनराजेंशी भेट झाली नव्हती. त्यामुळे खासदार संभाजीराजे उद्या दुपारी पुण्यात उदयनराजेंची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली.


पहिल्याचा पावसात झालेल्या मालाडच्या इमारत दुर्घटनेनंतर जीर्ण इमारतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच आता मालाड दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबईत गेल्या २४ तासात जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या ४४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये काल १२ तासांत सर्वाधिक २१४.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला असून १२ ते १३ जूनला रेड अलर्ट देण्यात आला आहे.


जगभरातील नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होण्याचा वेग मंदावताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी ५१ लाख ५६ हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ७६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ८६ लाख ६१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाली आहे.


मालाड पश्चिमेला काल बुधवारी रात्री मालवणी भागात एक इमारत कोसळल्याची मोठी दृर्घटना घडली. या दृर्घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात जखमींना दाखल केले गेले आहे. तसेच सध्या शोध मोहिम सुरू आहे.


मंगळवारी करण्यात आलेल्या नोंदी नुसार, १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर २९५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. दरम्यान, आज बुधवारी कालच्या तुलनेत कोरोना बळींच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. सविस्तर वाचा 


मुंबईतील मृतांची संख्या काल पुन्हा वाढली आहे. मुंबईत काल २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत सोमवारीही २७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी मुंबईत हिच संख्या केवळ ७ इतकी नोंदवण्यात आली होती. सविस्तर वाचा