घरताज्या घडामोडीLive Update: केईएम, नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या...

Live Update: केईएम, नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ‘ट्रायल’ घेण्यात येणार

Subscribe

पालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ‘ट्रायल’ घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने सर्व पूर्वतयारी केली आहे. पालिकेने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही पाठवले असून पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


महाराष्ट्रात वीजबिल भरावेच लागणार, माफी नाहीच – ऊर्जामंत्री

- Advertisement -


मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के वर आला आहे. त्यामुळे मुंबई तिसऱ्या स्तरामधून दुसऱ्या स्तरात आली आहे. परंतु दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू करण्याबाबत महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात ११,७६६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन सुखरुपपणे घरी परतले आहेत.


अमृता फडणवीसांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस.


कोविड आजार व त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि निगडित अनुभव या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेले ६५० पानांचे पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक जगाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी केले.


महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या  १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


येत्या ५ दिवसात कोकण मध्ये अत्यंत तीव्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.  आज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रविवारी मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची हवामान विभागाने दिली आहे.


भारतीय हवामान विभागामार्फत नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि. १३ व दि. १४ जून २०२१ या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्‍यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे.


मुंबईत आज शुक्रवारी ६९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज ६५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.
केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो. रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.


कोरोना महामारित मुख्य हॉट्सपॉट ठरलेली धारावी आता कोरोनामुक्त होत आहे. धारावीत गेल्या २४ तासात फक्त २  रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धारावीत सध्या फक्त १६ सक्रिय रुग्ण आहेत.


 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.


पुढील तीन तासात मुंबई,पुणे,रायगड,पालघरला प्रादेशिक हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.


कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यातही राज्याला यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारनं जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. पण, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.


खासगी रुग्णालयांसाठी कोविड-१९ लसींचे प्रतिमात्रा कमाल दर निश्चित

  • कोविशिल्ड प्रतिमात्रा ७८० रुपये
  •  कोवॅक्सिन प्रतिमात्रा १ हजार ४१० रुपये
  • स्पुटनिक व्ही प्रतिमात्रा १ हजार १४५ रुपये
  • ५ टक्के वस्तू व सेवा कर आणि १५० रुपये सेवा शुल्काचाही समावेश
  • निर्धारित दरांपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास होणार कारवाई
  • तक्रार नोंदविण्यासाठी महानगरपालिकेकडून इ-मेल आयडी उपलब्ध

शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच – शिवसेना


मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने स्लो ट्रॅकवरील ट्रेन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती एका ट्विटर युझरने आपल्या अकाउंटवरून दिली आहे.


पुण्यातील सर्व दुकानं, मॉल्स, अभ्यासिका, वाचनालय सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानं, मॉल्स ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक सुरू झाली आहे. गेल्या २० मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


मुंबईतील माहिममध्ये भागात पाणी साचलं.


मुंबईत काल, गुरुवारी सकाळपासून थोड्या प्रमाणात पाऊस पडला. पण त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या वाशीतही जोरदार सरी बरसत आहे.


आयएमडीने शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

पाहा सायनमधील व्हिज्युअल


जगभरातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू स्थिरावत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार,जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ५६ लाख ३ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ८८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ९१ लाख ३८ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गुरूवारी कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात गुरुवारी १२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ३९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


मुंबईत गुरुवारी ६६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हीच संख्या ७८८ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १४ हजार ४५० इतकी झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -