Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी डायबिटीज रुग्णांसाठी कोरोना ठरतोय कर्दनकाळ, अमेरिकेत अडीच लाख रुग्णांच्या मृत्यूचे ठरला कारण

डायबिटीज रुग्णांसाठी कोरोना ठरतोय कर्दनकाळ, अमेरिकेत अडीच लाख रुग्णांच्या मृत्यूचे ठरला कारण

Related Story

- Advertisement -

मधुमेह रुग्णांचा सर्वात मोठा शत्रू कोरोना व्हायरस आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू मधुमेह आजार व्यक्तींचे झाले आहेत. आतापर्यंत अमेरिकेत ६ लाख ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २.४० लाख लोकं मधुमेहग्रस्त होते आणि त्यांचा जीव कोरोना व्हायरमुळे गेला आहे. मधुमेह रुग्णांसाठी कोरोना किती धोकादायक आहे, हे समजले आहे. अमेरिकेच्या १० टक्के लोकसंख्येला मधुमेह आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अमेरिकेत जास्त आहे.

एडीएचे मुख्य वैज्ञानिक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉबर्ट गाबे म्हणाले की, एकूण मृत्यूपैकी मधुमेहग्रस्त ४० टक्के रुग्णांचा मृत्यू ही गंभीर बाब आहे. कोरोना महामारीचा कहर सुरुच आहे. अशातच अमेरिकेतच नाही तर जगभरातील सर्व देशांतील मधुमेह रुग्णांचा जीव कोरोनामुळे धोक्यात येऊ शकतो.

- Advertisement -

जर तुम्ही मधुमेहग्रस्त आहात आणि लसीचे दोन्ही डोस घेत असला तर तुम्ही स्वतःला सुरक्षित मानू शकत नाही. लस घेतल्यानंतर संसर्ग होणे हे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. ते याबाबत म्हणाले की, मधुमेहसोबत कोरोनाग्रस्त होणे म्हणजे रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यूचा धोका ६ ते १२ पटीने वाढतो.

पुढे डॉ. रॉबर्ट म्हणाले की, मधुमेह रुग्णाला कोरोना झाल्यावर त्याच्या आरोग्याचे अधिक नुकसान होते. अमेरिकेत उपचार करण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे आणि संपन्न देश आहे. परंतु येथे मधुमेह नियंत्रित करणे कठीण आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचे डोस पाहिजे असतात, परंतु सध्या इन्सुलिनची किंमत वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध होणे कठीण होत आहे.

- Advertisement -

भारतात मुधमेह रुग्णांची संख्या ८ कोटीहून अधिक आहे. जगातील प्रत्येक सहा रुग्णांपैकी भारतातील एक रुग्ण आहे. माहितीनुसार, २०१५ पर्यंत मधुमेह रुग्णांची संख्या १३.४ कोटी होईल. दरम्यान कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन लठ्ठपणा आणि मधुमेहचे प्रमाण वाढवेल, अशी तज्ज्ञांना चिंता आहे. जगातील सर्व देशांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मधुमेह आणि लठ्ठपणा एक नवीन आव्हान असणार आहे. अमेरिकेतील ४२ टक्के लोकसंख्या लठ्ठ आहे, तर ७३ टक्के लोकांचे वजन जास्त आहे, असे डॉ. गाबे म्हणाले.


हेही वाचा – Corona Pandemic: तीन आठवड्यांनंतर येणार कोरोनाची तिसरी लाट! ICMR चा इशारा


 

- Advertisement -