घरताज्या घडामोडीकोरोना हवेतून वेगाने पसरण्यासाठी स्वत:मध्ये करतोय बदल

कोरोना हवेतून वेगाने पसरण्यासाठी स्वत:मध्ये करतोय बदल

Subscribe

जगभरातील देशांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत असतानाच कोरोनामध्ये बदल होत असल्याचं समोर आलं आहे.

 

जगभरातील देशांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत असतानाच कोरोनामध्ये बदल होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना अधिकाधिक ताकदवान बनण्याबरोबरच वेगाने विकसित होण्यासाठी स्वत:मध्ये काही बदल घडवून आणत आहे. असे एका संशोधनात समोर आले आहे. क्लिनिकल इन्फ्केशियस डिजिसेस जर्नलमध्ये या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. सिंगापूरच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. कोरोना व्हायरस स्वत:ला अधिक ताकदवान बनवण्यासाठी विकसित करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी जगात आलेला पहीला कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत होता. पण आताच्या कोरोना व्हायरसने स्वत:मध्ये काही बदल करून घेतले आहेत. यामुळे श्वास घेताना, बोलताना आणि गातानाही हवेतील द्रवपदार्थ आरामात तोंडाद्वारे , नाकाद्वारे शरीरात प्रवेश करू शकणार आहे. आधीचा कोरानाचा प्रसारही हवेतून व्हायचा. पण आताच्या कोरोनाने स्वत:मध्ये असे काही बदल करून घेतले आहेत की त्यामुळे हवेतून त्याचा संसर्गाचा वेग वाढला आहे.

या संशोधनाच्या अहवालानुसार जगभरातील कोरोना रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा RNAआढळला आहे. श्वास घेताना हा व्हायरस हवेतून शरीरात गेल्याचे समोर आले आहे. त्याचा आकार पाच मायक्रोमीटरहून अधिक लहान आहे. असेच संशोधन युनिवर्सिटी ऑफ मॅरीलँडच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत विकसित केला. त्यावेळी हवेतूनच मोठ्या वेगाने कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मास्क लावणे गरजेचे असल्याचे तज्त्रांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -