आंध्रप्रदेशातील कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिधोकादायक नाही, कोविड कमांड सेंटरच्या प्रमुखांचा दावा

गेल्या वर्षी N440K हा स्ट्रेन दक्षिण भारतात B.1.36म्हणून ओळण्यात येत होता

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे नवे प्रकार म्हणजेच नवीन कोरोना स्ट्रेन समोर आले आहेत. देशभरात झपाट्याने कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यातच दक्षिण भारतात कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन समोर आला ज्याचे नाव N440Kअसे आहे. हा नव्या स्ट्रेनने तेलंगणा,कर्नाटक,महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागात फैलाव केला असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता कोरोनाच्या N440K हा नवीन स्ट्रेन अतिधोकादायक नसल्याचा दावा कोविड कमांड सेंटरच्या प्रमुखांनी केला आहे.   कोविड कमांड सेंटरचे प्रमुख डॉ. के.एस.जवाहर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील आंध्र,प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या प्रयोगशाळांमधून दर महिन्याला २५० नमुने CCMB ( Centre of Cellular and Molecular Biology)मध्ये पाठवले जातात. या नमुन्यांवर केलेल्या संशोधनात आतापर्यंत असे सिद्ध झाले नाही की, N440K हा कोरोनाचा स्ट्रेन अतिधोकादायक आहे.

CSIR सेंटरच्या शास्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत N440Kहा नवा व्हायरस स्ट्रेन आढळून आला होता. मात्र आता तो कमी झाला आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काळात हा स्ट्रेन अदृष्य होण्याची शक्यता असे,असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी N440K हा स्ट्रेन दक्षिण भारतात B.1.36म्हणून ओळण्यात येत होता. मार्च महिन्यात हा स्ट्रेनचा प्रभाव अचानक कमी झाला. आजही या स्ट्रेनचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असल्याचे शास्रज्ञांनी सांगितले आहे.

CCMB सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, N440K हा प्रयोग केलेल्या सेल कल्चरमध्ये अँक्टिव होता. मात्र सेल कल्चरमध्ये अँक्टिव असलेला विषाणू माणसाच्या गुंतागुंतीच्या साथीमध्ये अँक्टिव असेल असे सांगता येत नाही. N440K हा विषाणू जर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असेल तर त्याची WHO च्या अहवालात नोंद हवी. मात्र WHOच्या अहवाल असा कोणताही उल्लेख नाही, असे CCBMने सांगितले आहे.


हेही वाचा – पहा व्हिडिओ : भीषण ! पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला