Corona New Wave: उन्हाळ्यात कोरोनाचा कहर, डेल्टाचा सब वेरियंट घेतोय भयावह रुप

कोरोनाचा डेल्टा वेरियंट भयावह रुप घेत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

deltacron covid 4th wave of india symptoms new coronavirus variant

दिल्ली, हरयाणासह काही राज्यांमध्ये कोवीड रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे काही राज्यांमध्ये शिथिल केलेले कोवीड निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. याचदरम्यान, कोरोनाचा डेल्टा वेरियंट भयावह रुप घेत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. कोरोनाच्या ज्या डेल्टा वेरियंटमुळे दुसरी लाट आली होती तोच हा घातक वेरियंट असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

नुकतेच कोवीडच्या वेरियंटवर इस्त्रायलमध्ये संशोधन करण्यात आले. त्याचा अहवाल The Total Environment या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. डेल्टा विषाणू जीवघेणा असल्याचे यात सांगण्यात आले आहे. तसेच डेल्टाने त्याच्याआधी म्युटेंट झालेल्या विषाणूंचा खात्मा केला. पण डेल्टा नंतर आलेल्या ओमिक्रॉन या वेरियंटला सु्द्धा डेल्टाला संपवता आलेले नाही. यामुळे डेल्टा पुन्हा कहर करू शकतो अशा धोक्याचा इशारा यात अहवालात तज्त्रांनी दिला आहे. इस्त्रायलच्या Ben-Gurion University च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. विशेष म्हणजे या संशोधनासाठी नाल्यातील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यावरून कोरोना वेरिंयटमधील फरक अभ्यासला गेला होता.

यासाठी डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीदरम्यान कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला होता. त्यासाठी Beer-Sheva शहरातील नाल्यांमधील नमुने तपासण्यात आले. त्यात डेल्टा आणि ओमीक्रॉनच्या परस्परांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. प्राध्यापक Ariel Kushmaro यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. त्यावरून उन्हाळ्यात ओमीक्रॉम आणि डेल्टा वेरियंटचा संसर्ग वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हवेतून पसरतोय कोरोना

इस्त्रायलबरोबरच भारतातही कोरोनाच्या सद्यस्थितीवर संशोधन करण्यात आले आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB)आणि चंदीगढ़ मधील IMTechने कोरोना हवेतून पसरत असल्याचा दावा केला आहे. तसेच मोकळ्या हवेच्या तुलनेत बंद जागेत कोरोनाचा संसर्ग वेग अधिक असल्याचे संशोधनात आढळले.