घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona:जग कोरोनाशी लढतंय आणि उ.कोरिया मिसाईल डागतंय! कोण समजावणार?

Corona:जग कोरोनाशी लढतंय आणि उ.कोरिया मिसाईल डागतंय! कोण समजावणार?

Subscribe

कोरोनाशी अवघं जग लढत असताना उत्तर कोरिया मात्र मिसाईल डागण्यात मग्न असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एकीकडे अवघ्या जगाला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असतानाच तिकडे कोरीया मात्र ‘कोण आहे हा कोरोना?’ अशाच आविर्भावात वागत असताना दिसून येत आहे. जगभरात आत्तापर्यंत ३० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये कोरोनाने केलेला संहार अवघ्या जगाची झोप उडवून देणारा आहे. युरोपीय देशांप्रमाणेच अमेरिकेतही कोरोनाने १ हजार लोकांचा बळी घेतला आहे. तर सुमारे १ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या घटनांमुळे सगळं जग चिंतेत असताना उत्तर कोरियाचा न्यूरो मात्र मिसाईल डागण्यात मग्न आहे!

उत्तर कोरियाचा न्यूरो मिसाईल डागतोय!

अशी आख्यायिका आहे की जेव्हा ऐतिहासिक युद्धादरम्यान स्पेन जळत होतं, तेव्हा स्पेनचा राजा न्यूरो फिडल वाजवत होता. तसाच काहीसा प्रकार आता उत्तर कोरियामध्ये घडताना पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाचा महाभयंकर उत्पात सुरू असताना उ. कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी मात्र गेल्या महिन्याभरात ९ मिसाईलची चाचणी घेतली आहे. या चाचण्यांसाठी खुद्द किम जोंग उन हजर होते. रविवारी एकामागोमाग दोन लघु आणि मध्यम पल्ल्याच्या मिसाईलची चाचणी कोरियाने केली. या पार्श्वभूमीवर जग कोरोनाचा सामना करत असताना उत्तर कोरिया कोणत्या युद्धाची तयारी करत आहे? अशी टीका आता केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, उत्तर कोरियाच्या या कृतीवर दक्षिण कोरियाने टीका केली आहे. ‘जगभरात कोरोनाचं संकट फैलावलेलं असताना
उत्तर कोरियाने अशा प्रकारे मिसाईलची चाचणी घेणं चुकीचं आहे. त्यामुळे या चाचण्यांवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीने बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी दक्षिण कोरियाकडून करण्यात आली आहे.

उत्तर कोरिया माहिती लपवतोय?

अवघं जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं असताना उत्तर कोरियामध्ये मात्र अद्याप एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर याविषयी शंका घेतली जात आहे. किम जोंग उन यांच्या लहरी, हुकुमशाही आणि आक्रमक
स्वभावानुसार त्यांनी देशातील कोरोनाबाधितांची माहिती लपवून ठेवली असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.


Coronavirus: इटलीत करोनाचा कहर; एका दिवसात ९१९ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -