Live Update: मुंबईत सध्या ७४१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू

coronavirus maharashtra cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray sanjay raut cwg 2022 bmc election monsoon 2022

काल दिवसभरात ९८ पोलीस कोरोनाबाधित आढळले आहे. आतापर्यंत १२६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ७४१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.


मुंबईत आज गेल्या २४ तासांत १६ हजार ४२० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १४ हजार ६४९ रिकव्हर झाले आहेत.


उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार


आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देण्याचा निर्णय.
( परिवहन विभाग )

दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
( कामगार विभाग )

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या “निवासी” हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत.
(नगर विकास विभाग)


पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


नितेश राणेंना दिलेला दिलासा तूर्तास कायम

‘अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही’, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

उद्या, गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा होणार सुनावणी


जगभरात आतापर्यंत ११५ जणांचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला असून भारतात एका रुग्णांचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


नितेश राणे यांच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, उद्या दुपारी 1 वाजता हायकोर्टात होणार सुनावणी


टीईटीमार्फत भरती झालेल्या शिक्षकांची प्रमाणपत्र तपासणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्षांची माहिती


कालीचरण महाराजाला आज वर्धा न्यायालयात केले हजर


ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने पुढील 10 ते 12 दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हे उपचार सुरु आहेत.कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, जन शताब्दी एक्सप्रेस कामथे स्थानकावर थांबली


पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा अध्यक्ष इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समितीत समावेश


राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; गारपिटीचं नुकसान, राज्यातील कोरोनास्थिती यासह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा


देशात गेल्या 24 तासात 1,94,720 कोरोनाबाधित रुग्ण, तर 442 लोकांचा मृत्यू


पंतप्रधान मोदी करणार 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन, तामिळनाडूला मिळणार 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं


आळंदीचे संत ज्ञानेश्वर मंदिर 2 दिवस बंद राहणार, उद्या रात्री 8 वाजेपासून ते 15 जानेवारीपर्यंत सकाळी 8 पर्यंत बंद राहणार, मकर संक्रांतीला होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय


कोरोनावर उपचार करण्यासाठी आता ‘मोलनुपिरावीर’ औषधाचा समावेश केला जाणार नाही, असं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.


पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी  चौकशी समिती नेमण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार