Live Update: गोवा विधानसभा निवडणूकीची दुसरी यादी जाहीर

live update
लाईव्ह अपडेट

गोवा विधानसभा निवडणूकीची दुसरी यादी जाहीर


मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोद धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर येत आहे.


 

पुण्यात आज ४,०२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात सध्या १४,८९० अँक्टिव्ह रुग्ण आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची उद्या बैठक, सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार.


पंतप्रधानांच्या कोरोना आढावा बैठकीला सुरुवात


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखाली उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात होणार


मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया परिसरात मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहणी केली जात आहे.


पिलीभीतचे लोकसभेचे भाजप खासदार वरुण गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.


कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली तातडीची बैठक


सुली डील अॅप प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओमकारेश्वस ठाकूर या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.


अरिजीत सिंग आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

Me and my wife have tested Covid Positive. We are all perfectly fine and have quarantined ourselves.

Posted by Arijit Singh on Saturday, January 8, 2022

 


पिंपरी-चिंचवडमध्ये एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली होती. एक तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे.


देशात सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या दोन राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.


राजधानी दिल्ली काही भागात पावसाची हजेरी लावली आहे. पुढील चार ते पाच दिवसही महाराष्ट्रात पावसासोबत गारपिट पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ७ ते ११ जानेवारी दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ९ जानेवारीला, आज विदर्भातील काही भागांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-इंडिया नुसार, दिल्लीची हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत सुधारली आहे आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 90 वर आहे.