Live Update : मुंबई महानगरपालिकेत गेल्या 6 तासांपासून भाजपाचे ठिय्या आंदोलन 

live update

मुंबई महानगरपालिकेत गेल्या 6 तासांपासून भाजपाचे ठिय्या आंदोलन


पर्रिकरांना लोक मनोहर पर्रिकर म्हणून मत देत नव्हते, मनोहर पर्रिकर लोकांच्या पाठीशी भक्कम उभे राहत होते म्हणून त्यांना लोक मत देत होते, पणजीची लढाई कठीण पण वडीलांच्या स्वप्नपूर्तीसाठी लढणार, पणजीतील लोकांसाठी मला माझे वजन दाखवावे लागणार,  उत्पल पर्रिकर


ऋषिकेश देशमुखांच्या जामीन अर्जावर 24 जानेवारीला होणार सुनावणी


मनसुख हत्या आणि अँटिलिया प्रकरणाबाबत चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंना अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे स्वतः अनिल देशमुखांना प्रश्न विचारणार.


इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या शिबिराला नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ५० पेक्षा अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीला पोलिसांचा विरोध आहे. या काँग्रेसच्या शिबिराला अशोक चव्हाण, भाई जगताप, नसीम खास आदी नेते उपस्थित आहेत.


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्यात शिवसेनेचा प्रचार करणार – खासदार संजय राऊत


गोव्याचं राजकीय वातावरण दुषित झालंय – संजय राऊत


शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शैलेश वेलिंगकरांचा सेनेत पक्षप्रवेश


उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुण्यात कोरोना आढावा बैठक घेणार


पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विक्रम कुमार यांनी संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.


गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४७ हजार २५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर २ लाख ५१ हजार ७७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


लोकमत वृत्तपत्राचे समन्वयक संपादक दिनकर रायकर यांचं निधन झालं. मुंबईतल्या नानावटी रुग्णालयातील उपचारादरम्यान वयाच्या ८०व्या वर्षी दिनकर रायकर यांनी अखेरचा श्वास घेतला.


मध्य रेल्वेवर उद्या, २२ आणि २३ जानेवारी १४ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर मेगाब्लॉक असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर २२ जानेवारीच्या मध्यरात्री १ वाजून २० मिनिटे ते २३ जानेवारीच्या दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.


देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत २१ जानेवारीला मोठ्या प्रमाणात पाणीकपात होणार आहे. तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मुंबईतील भायखळा परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन आणि डॉकयार्ड रोडजवळील १४५० मिमी व्यासाची जुनी पाईपलाईन काढण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. सविस्तर वृत्त वाचा