घरताज्या घडामोडीLive Update : मुंबईत आज 1,857 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 11 रुग्णांचा...

Live Update : मुंबईत आज 1,857 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 11 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आज 1,857 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 11 रुग्णांचा मृत्यू (सविस्तर बातमी वाचा)

- Advertisement -

उत्तरप्रदेशमध्ये सपाची उमेदवारी यादी जाहीर


पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपची शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात याचिका

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या तब्येतीची केली चौकशी


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजार तब्बल दोन हजार अंकांनी घसरला आहे. सध्या सेन्सेक्स ५७ हजार ५०० अंकांवर, तर निफ्टी १७ हजार १४१ अंकावर आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे.


मुंबईत पार पडणार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९वा वर्धापन दिन

उद्या मंगळवार २५ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस २९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुंबईत मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ २९व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासोबत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दुपारी ३ वाजता दादर येथील टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मुंबई, कोल्हापूर, पुणे याठिकाणी भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईत दादरमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नाना पटोलेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन याठिकाणी करण्यात आले.


इचलकरंजीतील टेक्स्टाईल पार्कमधील यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यात भाजपचे आंदोलन सुरू आहे. पुण्यातील अलका चौकशात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात भाजप नाना पटोलेंविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनात अनेक भाजप महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.


मुंबई शेअर बाजारात घसरण सुरुच. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ६१२ अंकाची घसरण झाली असून आठवड्याभरात शेअर बाजारात २ हजार ५०० अंकांनी घसरला आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. त्यामुळे मुंबईतील नाना पटोलेंच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठकी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.


राज्यभरातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. यादरम्यान २० ते ३० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -