घरताज्या घडामोडीLive Update: राज ठाकरेंच्या नावापुढे आता 'मराठी ह्रदयसम्राट'

Live Update: राज ठाकरेंच्या नावापुढे आता ‘मराठी ह्रदयसम्राट’

Subscribe

राज ठाकरेंच्या नावापुढे आता ‘मराठी ह्रदयसम्राट’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे आता मराठी ह्रदयसम्राट अशी उपाधी लावण्यात यावी. अशी सूचना महाराष्ट्रातील मनसैनिकांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात 2 हजार 831 कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- संजय राऊत यांच्या २ तास वर्षावर बैठक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली आहे.


 

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे.

चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!

चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!

याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!


मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटली, २४ तासात १९७ कोरोनाबाधितांची नोंद

१५ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्ण-२३५

२४ तासात बरे झालेले रुग्ण-४४६

बरे झालेले एकूण रुग्ण-१०३२६३२
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%

एकूण सक्रिय रुग्ण-२३०१

दुप्पटीचा दर-१९३०दिवस
कोविड वाढीचा दर (८फेब्रुवारी- १४फेब्रुवारी)-०.०४% (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


नवाब मलिकांना चांदीवाल आयोगाकडून समन्स

अँटिलीयाबाहेर स्फोटके ठेवण्यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. याविरोधात सचिन वाझेनी आपली प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मलिकांना चांदीवाल आयोगाने समन्स बजावला आहे.


मोहित कंबोज आज संध्याकाळी ६.१५ वाजता पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना उत्तर देणार


महाराष्ट्र विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीमध्ये घेण्याचे कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलं आहे. – मंत्री अनिल परब


पत्रा चाळच्या जमीन खरेदीत पीएमसी घोटाळ्याचा पैसा – संजय राऊत


पत्रा चाळीची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज – संजय राऊत


मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार – संजय राऊत


देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज – संजय राऊत


विरोधकांना धमकावणे हीच लोकशाही आहे का?, मोदी, शहांना राऊतांचा सवाल


मला जेलमध्ये घाला, गोळी मारा, मी घाबरणार नाही – संजय राऊत


जितेंद्र चंद्र नवलानी कोण आहे हे सांगा? ईडीला राऊतांचा सवाल


पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करा – संजय राऊत


पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा थेट भाजपसोबत आर्थिक संबंध – संजय राऊत


किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप तीन वेळा ईडीला पाठवले आहेत – संजय राऊत


निकॉन इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनीचे संबंध किरीट सोमय्यांच्या मुलासोबत – संजय राऊत


निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? असा सवाल किरीट सोमय्यांना राऊतांनी विचारला


पीएमसी बँक घोटाळ्यात आम्ही पैसे वापरतायत असे सांगितले जातेय – संजय राऊत


पीएमसी बँक घोटाळा, पत्रा चाळीशी आमचा संबंध लावला – संजय राऊत


महाआयटीमध्ये २५ कोटींचा घोटाळा- संजय राऊत


फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा – संजय राऊत


एका भाजप वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कारपेट घातले होते. त्याची चौकशी करण्यासाठी ईडी गेली का? – संजय राऊत


लग्नातील कपडे शिवलेल्या व्यक्तीकडेही ईडी गेली – संजय राऊत


माझ्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्याकडे ईडी गेली होती – संजय राऊत


माझ्या ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय – संजय राऊत


माझ्या आयुष्यात मी कधी चुकीचे काम केले नाहीत – संजय राऊत


आज सकाळी संजय राऊतसंबंधित बँकेत ईडी झाली होती दाखल – संजय राऊत


मराठी भाषेला विराध करणारे सोमय्या भाजपचा फ्रंटमॅन


कोरलाईत जर १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडणे, पण जर कोरलाई १९ बंगले दिसले नाही तर त्या दलाला जोड्याने मा – संजय राऊत


कोरलाई गावात १९ बंगले बांधून ठेवलेत म्हणे, असे त्या दलालने आरोप केला – संजय राऊत


ईडीच्या कार्यालयासमोर आजची पत्रकार परिषदेत घेण्याची योजना करणार होतो. पण शेवट तिथे करण्याचा निर्णय घेतला – संजय राऊत


महाराष्ट्रात भाजपने नालायकापणा सुरू केलाय – संजय राऊत


जे माझ्यावर आरोप झालेत, त्यातील एकही आरोप खरा नाही – संजय राऊत


मुलूंडचा दलाल म्हणून किरीट सोमय्यांचा उल्लेख संजय राऊतांची पत्रकार परिषदेत केला


पवार कुटुंबियांना टाईट करण्याची धमकी – संजय राऊत


तुम्ही बाहेर पडला नाही तर, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील आणि फिस करतील – संजय राऊत


केंद्रीय तपास यंत्रणेचे संकट महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालवरही – संजय राऊत


महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जात आहे – संजय राऊत


कितीही पाठीमागून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही – संजय राऊत


पाच ते दहा मिनिटांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी फोन केला – संजय राऊत


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वंदन करतो – संजय राऊत


संपूर्ण शिवसेना आज उपस्थितीत – संजय राऊत


अनेक लढे शिवसेना प्रमुख्यांच्या नेतृत्वातून शिवसेना भवनातून केले आहेत – संजय राऊत


मला असं वाटतंय ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे – संजय राऊत


थोड्याच वेळात संजय राऊत गौप्यस्फोट करणार


खासदार अरविंद सावंत
खासदार विनायक राऊत
शिवसेना उपनेते सचिन अहिर
खासदार अनिल देसाई
आमदार मनीषा कायंदे
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के
आमदार रवींद्र फाटक
आमदार सदा सरवणकर
मंत्री उदय सामंत, आदेश बांदेकर यांच्यासह शिवसेनेचे बरेचसे आमदार शिवसेना भवनात उपस्थित


संजय राऊतांची पत्रकार परिषद असल्यामुळे वाहतुक संथी गतीने चालू राहू शकते. अशा प्रकारचं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं होतं. त्यावर मुंबई पोलीस कोणाची काळजी घेत आहेत, असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारलाय.


खासदार संजय राऊत शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.


सामनाच्या कार्यालयातून संजय राऊत शिवसेना भवनाकडे रवाना झाले आहेत.


खासदार विनायक राऊत सेना भवनात पोहचले.


शिवसेना भवनासमोर शेकडो कार्यकर्त्यांची हजेरी


खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला आता थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.


ईडीची चार तास हसीना पारकरच्या घरी चालली छापेमारी. आता ईडी हसीना पारकरच्या घरातून निघाली आहे.


आजच्या ईडी छापेमारीत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले


माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्वनी कुमार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला


चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा निर्णय


दाऊद इब्राहिम संबंधित ईडीच्या छापेमारीत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी ४ वाजता बैठक होण्याची शक्यता आहे


दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांची छापेमारी


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या कराराबाबत मुंबईतील विविध ठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरू आहे. ई़डीच्या केंद्रीय विभागाचे पथकही मुंबईत दाखल झाले आहे.


कोल्हापूर आणि मिरजेतून सुटणाऱ्या सहा एक्स्प्रेस कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-बिदर एक्स्प्रेस अशा एकूण सहा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.


देशात गेल्या २४ तासांत २७ हजार ४०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८२ हजार ८१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख २३ हजार १२७ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत १७३.४२ कोटी लसीकरण झाला आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू


हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे. दुपारी २.३० वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनमध्ये दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना भवनखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे. आज पत्रकार परिषदमध्ये भाजपच्या आरोपांना शिवसेना उत्तर देणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या साडेतीन लोकांचा खुलासा होणार आहे. काल, सोमवारी खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या कोठडीत भाजपचे साडेतीन लोकं असतील आणि अनिल देशमुख जेल बाहेर असतील असे वक्तव्य केलं होत. त्यामुळे आता भाजपचे ते साडेतीन लोकं कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनाचे ठिकाण बदलल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -