Live Update: कोरोनामुळे मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

corona omicron india maharashtra mumbai update Priyanka Chopra 22 January 2021 assembly election 2022
corona omicron india maharashtra mumbai update Priyanka Chopra 22 January 2021 assembly election 2022

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली. उद्या, मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्यानंतर माझ्यावतीने दाखलकरण्यात आलेल्या review petition वरील सुनावणी उद्या 12 जानेवारी रोजी…

Posted by Vinod Patil on Tuesday, January 11, 2022

 


सह्याद्री अतिगृहावरील राष्ट्रवादी नेत्यांची बैठक संपली


सह्याद्री अतिगृहावर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक असे अनेक राष्ट्रवादीचे नेते बैठकीस उपस्थिती झाले आहे. राज्यातील विविध विषयांवर गेल्या दोन तासांपासून बैठक सुरू आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर दिवसभरात १४ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत १ लाखांहून अधिक रुग्ण सक्रीय आहेत. सविस्तर वृत्त वाचा 


पालघर खासदार राजेंद्र गावित यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


गोव्यात गेल्या २४ तासांत २ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या गोव्यात १२ हजार १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


ज्येष्ठ ओडिया अभिनेते मिहिर दास यांचे वयाच्या ६४व्या वर्षी कटक येथील रुग्णालयात निधन झाले.


दिल्लीत कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत २१ हजार २५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेट २५.६५ टक्के एवढा झाला आहे. दिल्लीत सध्या ७४ हजार ८८१ सक्रीय रुग्ण आहेत.


१२ आमदार निलंबन प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात ५ तास युक्तिवाद झाला. आम्ही समाधानी असून आम्हाला सर्वोच्च न्यायालयातच न्याय मिळेल. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असे ट्वीट भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. 


भारताचा अष्टपैलू क्रिकेटर वाशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित


मणिपूरमध्ये ५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करणार


पाच राज्यांपैकी तीन राज्यात (उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर) राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार


शरद पवार लवकरच उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार


थोड्याच वेळात राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला होणार सुरुवात


गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना कोरोनाची लागण


दिल्लीतील ईडीच्या मुख्य कार्यालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, १४ जानेवारीला होणार उद्घाटन


लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु


12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु, परब यांना ठराव मांडण्याचा अधिकार नाही.


स्वबळावर लढण्याचा त्या-त्या पक्षाचा निर्णय, शरद पवारांची कोणालाच अॅलर्जी होता कामा नये -छगन भुजबळ


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक , सायंकाळी 4 वाजता होणार बैठक


गेल्या 24 तासात मुंबईतील २ पोलीस कर्मचारी कोरोनाचे बळी


एसटी कर्मचारी शरणाप्पा मुंजाळे यांचा शहापूर या उपोषणास्थळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मुंबईतील मंत्र्यांची बैठक मोबाईलवर पाहत असताना मृत्यू, कर्मचाऱ्यांचा दावा


ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना जाण्यास बंदी


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद, ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता नवीन राष्ट्रवादी भवन बलार्ड इस्टेट, जे. एन. हेरेडीया मार्ग याठिकाणी होणार पत्रकार परिषद


देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे. जम्मू काश्मीरपासून राजस्थानमध्ये थंडी वाढली आहे. यात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात किमान तापमानात घट झाली. दरम्यान बिहार, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि मराठवाड्यातील काही भागांसह दक्षिण तमिळनाडू, केरळ व अंदमान निकोबारच्या काही भाात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.