घरदेश-विदेशLive Update: रमेश देव यांच्यावर उद्या पारसीवाडा विलेपार्ले पूर्व येथे अंत्यसंस्कार होणार

Live Update: रमेश देव यांच्यावर उद्या पारसीवाडा विलेपार्ले पूर्व येथे अंत्यसंस्कार होणार

Subscribe

उद्या, गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसीवाडा विलेपार्ले पूर्व येथे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार


तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत १४ हजार १३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २४ हजार ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या तामिळनाडूत १ लाख ७७ हजार ९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ९३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

- Advertisement -

गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत ८ हजार ९३४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १५ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी आहेत. तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या गुजरातमध्ये ६९ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


उद्या बोर्डाची सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन आणि वेळेत होणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री आणि बोर्ड अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.


मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवाराची तिसरी यादी जाहीर केली आहे.


नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सविस्तर वृत्त वाचा 


मुंबई महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार


नितेश राणे प्रकरणात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद संपला


नितेश राणे प्रकरणात पोलिसांना बाजू मांडण्यासाठी न्यायालयाची नोटीस


नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने न्यायालयीने कोठडी सुनावली आहे.


मी सरेंडर होण्यासाठी कोर्टात जातोय- नितेश राणे


राज्यसभेचे कामकाज उद्या ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब


नितेश राणेंकडून हायकोर्टातील जामीन अर्ज मागे, कोर्टात येणार शरण

 


नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग कोर्टाने फेटाळला, नितेश राणे कणकवली कोर्टात शरण येण्याची शक्यता


माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे निवडणूकीच्या राजकारणातून सन्यास, कणकवलीतील एका कार्यक्रमादरम्यान घोषणा


पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांनी अटक


पेगाससच्या मुद्द्यावरील आंदोलनादरम्यान मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी पोलिसांनी घेतले ताब्यात


पेगाससच्या मुद्द्यावरून दादरमध्ये भाजप- काँग्रेस आमनेसामने, झिशान सिद्धीकी पोलिसांच्या ताब्यात


पेगाससच्या मुद्द्यावरून मुंबईत काँग्रेसविरोधात भाजप नेत्यांचे आंदोलन, प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु


हिंदुस्तानी भाऊविरोधात कारवाई करावी- रुपाली पाटील- ठोंबरे


कोरोनानंतर जगाचे स्वरुप पूर्णपणे बदलणार आहे- पंतप्रधान मोदी


राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची आज दुपारी 2.00 वाजता महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद, मंत्रालयाच्मुया ख्य इमारत दालन क्रमांक 502 ही पत्रकार परिषद होणार आहे.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेसाठी मंत्री विजय वडेट्टीवार राज्यपालांच्या भेटीला 


कोर्ट परिसरात पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल (सविस्तर वाचा)


पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणी अनिल देशमुख यांचा एसीबीने नोंदवला जबाब


मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक


अर्थसंकल्पामध्ये गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकतं माप- संजय राऊत 

मुंबईवरील भगवा उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न- संजय राऊत

मुंबईतले उद्योग पळवण्याचा उद्योग सुरु- संजय राऊत

मुंबईला ओरबाडण्याचा केंद्र सरकार आणि भाजपचा डाव – संजय राऊत


राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, 3.30 वाजता मंत्रालयात होणार बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे राहणार उपस्थित


अनिल देशमुख यांचे वकील अनिल डागा यांचा जामीन मंजूर


पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर


दहावी, बारावीच्या ऑनलाईन परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांना चिथवून आंदोलन घडवून आणल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास फाटकला नागपूर पोलीस अटक करणार आहेत. तसेच  आंदोलनात सहभागी युवकांविरुद्ध पोलीस कारवाई करणार आहे.  ‘हिंदुस्थानी भाऊ’वर अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.


70 आणि 80 दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या बहिणचे म्हणजेच रौशनी रवैल सेठी  यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -