घरताज्या घडामोडीOmicron Symptoms : तुमचेही केस गळताहेत ? ओमिक्रॉनचे नवे लक्षण समोर

Omicron Symptoms : तुमचेही केस गळताहेत ? ओमिक्रॉनचे नवे लक्षण समोर

Subscribe

सामान्यपणे केस गळणे ही सर्वसामान्य समस्या अनेकांमध्ये आढळून येते. अनेक लोक या समस्येसोबत त्रस्त होताना दिसून येतात. अनेकदा या केस गळण्याच्या समस्येवर अनेक उपाययोजनाही केल्या जातात. पण सध्याच्या वातावरणात जर तुमचे केस गळत असतील याचे एक कारण कोरोनाची लक्षणेही असू शकते. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यासाठी अडथळा अशी अनेक कारणे समोर आली आहेत. तर अन्नाची चव न लागणे आणि वास न येणे यासाऱख्या लक्षणांचाही समावेश आहे. त्यामध्येच आता एक लक्षणाची भर पडली आहे, ती म्हणजे केस गळती.

कोणत्याही प्रकारचे लक्षण न आढळणारेही रूग्णांची वाढ ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीएंटच्या निमित्ताने दिसून आली आहे. त्यामध्ये दोन लक्षणांची भर पडली आहे, त्यापैकी एक डोळे लाल होणे आणि दुसरे लक्षण म्हणजे केसगळती होणे हे प्रामुख्याने समोर आले आहे. कोरोना व्हायरस एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एंजाईमच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतो. त्यासोबतच डोळ्यांच्या माध्यमातूनही कोरोनाचा शरीरात संसर्ग होत असल्याचा खुलासा नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

डॉक्टरांच्या संशोधनानुसार ACE2 एंजाइमच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू शरीरात संसर्ग फैलावतो. अनेकदा शरिरातील संसर्ग हा सर्वसामान्य व्हायरल अटॅकसारखा जाणवतो. पण डोळ्यांच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास व्हायरसचा हल्ला थेट रेटिना आणि एपिथेलिअल सेलवर होतो. त्यामुळे डोळे लाल होतानाच, डोळ्यांना सुजही येते. तसेच डोळ्यातून पाणी येणे आणि डोळा दुखणे यासारखीही लक्षणे समोर आली आहेत. कोरोनाच्या या नव्या लक्षणावर सध्या संशोधन सुरू आहे. अमेरिकन अकॅडमीचे डर्मोटॉलॉजी असोसिएशनचे म्हणणे आहे की, हे लक्षण तापामुळेही असू शकते.

तर केस गाळण्याच्या प्रकारामध्ये एखाद्या आजारामुळेही केस गळण्याचे प्रकार समोर येतात असे दिसून आले आहे. साधारणपणे एखाद्या दीर्घकालीन आजारामध्ये किंवा ताप आल्यानंतर २ ते ३ महिने केसगळती झाल्याचे दिसून येते. पण तुम्ही तंदुरूस्त असूनही केस गळतीचा अनुभव येत असेल तर तुम्हाला कोरोनाची लागण किंवा संक्रमण झालेले असू शकते. कोरोनाच्या संसर्गावर उपचारानंतर सहा ते नऊ महिन्यांनंतर केस गळती थांबते असे संशोधनातून समोर आले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -