घरताज्या घडामोडीOmicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा

Omicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा

Subscribe

कोरोना महामारीच्या लढाईदरम्यान नव-नवीन व्हेरियंट येऊन जगाची चिंता वाढवत आहेत. डेल्टा व्हेरियंटनंतर आता ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत जगभरात पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन पसरल्याचे बोलले जात आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेपूर्वीचे दोन देशांनी ओमिक्रॉन केस आढळल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉन हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरल्याचा नवा खुलासा झाला आहे. नेदरलँडच्या आरआयवीएम आरोग्य संस्थेने १९ आणि २३ नोव्हेंबरला नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन आढळल्याची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, दक्षिण आफ्रिकेने सर्वात पहिल्यांदा २४ नोव्हेंबरला ओमिक्रॉन आढळल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेला दिली. पण नवीन व्हेरियंट कसा आणि कुठून पसरला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ओमिक्रॉनने पुन्हा एकदा देशांना निर्बंध लादण्यास भाग पाडले आहे. खासकरून अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान भारतात अजूनपर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे मांडविया म्हणाले. तरी देखील सावध होऊन आजपासून केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची अंमलबजावणी झाली आहे. तसेच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सहा उपाय सांगितले आहेत.

  • केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे, जेणेकरून योग्य वेळी लागण झालेल्या व्यक्तींना ओळखता येईल आणि प्रकरणांची व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल.
  • केंद्राने राज्यांना कंटेन्मेंट झोन तयार करण्यास सांगितले आहे.
  • तसेच राज्याला प्रत्येक स्तरावर देखरेख वाढण्यासाठी सांगितले आहे.
  • शिवाय लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यास सांगितले आहे.
  • तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सांगितले गेले आहे.

हेही वाचा – Omicron Variant Guidelines: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची आजपासून अंमलबजावणी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -