Live Update: रशिया-युक्रेन युद्धावर युएनमध्ये आपात्कालीन विशेष सत्र सुरू 

maharashtra assembly session live speaker election rajan salvi rahul narvekar bjp cm eknath shinde shiv sena uddhav thackeray mva govt

रशिया-युक्रेन युद्धावर पुन्हा युएनमध्ये आपात्कालीन विशेष सत्र सुरू


रशिया-युक्रेनमधील बैठक संपली. क्रिमिया आणि डोनबासमधून सैन्य मागे घेण्याची युक्रेनने केली मागणी


मुंबईत गेल्या २४ तासांत ७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकाही मृत्यूची नोंद नाही. तसेच ९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ८१५ सक्रीय रुग्ण आहेत.


मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव


मागण्या मान्य झाल्याने संभाजीराजेंनी उपोषण घेतलं मागे


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे संभाजीराजे यांच्या भेटीला


५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडल्याचा दावा यूएनने केला आहे.


वर्षा बंगल्यावरच्या चर्चेनंतर शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे.


रशिया आणि युक्रेनच्या बेलारुसमधील बैठकीला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या बैठक सुरू झाली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी संध्याकाळी ७ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रामटेकवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार आहे.


कांजुरमार्गमधील एनजी रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल


भारतीय पत्रकारांनी तात्काळ कीव शहर सोडावे, भारतीय दूतावासचे आदेश


रशिया- युक्रेन शिष्ठमंडळाची आज दुपारी ३.३० वाजता शांतता चर्चा


छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांची प्रकृती खालावली,रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला


राजधानी कीवमधून विकेंड कर्फ्यू हटवला. भारतीय नागरिकांना देशाच्या पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याचा सल्ला

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवमध्ये विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय दूतावासने भारतीय नागरिकांना देशाच्या पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी युक्रेनमध्ये विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.


युरोपीय देशांचे रशियावर हवाई निर्बंध


मराठा समन्वयक आणि राज्य सरकारमध्ये वर्षावर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यानंतर मराठा समन्वयक वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. मराठा आरक्षण आणि राजेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यात यावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहे. संभाजीराजेंनी सांगितले आहे की, २२ मागण्या असून ६ मागण्या तातडीने मंजूर होऊ शकतात यामुळे त्या मंजूर कराव्यात अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना फोन; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे केले आवाहन


अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेले जाईल. नवाब मलिक यांचे कार्यालय त्यांना 25 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

यशवंत जाधव यांच्या घरी सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरु


राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपने भूमिका घ्यावी – संजय राऊत


युक्रेनमधून 2000 भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, 249 नागरिकांना घेऊन 5 वे विमान दिल्लीला रवाना


समीर वानखेडेंच्या याचिकेवर आज सुनावणी


ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी


युक्रेन – रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्र संघाची आत्पकालीन बैठक