Live Update : मुंबईत गेल्या २४ तासात २९ कोरोनाबाधितांची नोंद, ३१ रुग्णांची कोरोनावर मात

Live Update

Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात २९ कोरोनाबाधितांची नोंद, ३१ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत गेल्या २४ तासात शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

१९ मार्च, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्ण-२९

२४ तासात बरे झालेले रुग्ण-३१

बरे झालेले एकूण – १०३७६४२
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%

एकूण सक्रिय रुग्ण-३१५

दुप्पटीचा दर-१७४४४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ मार्च-१८ मार्च )-०.००४%


राज्यात गेल्या २४ तासात ९७ कोरोनाबाधितांची नोंद, १ रुग्णाचा मृत्यू

२५१ रुग्णांची कोरोनावर मात


कासुर्डी गावातील केमिकल कंपनीमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश

परिसरात धुराचे लोट


Mega Block : हार्बर लाईनवर ८ तासांचा मेगाब्लॉक, मेन लाईनवर काय परिस्थिती?

(सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुंबईतील बंगल्यावर पुन्हा एकदा महापालिकेची नोटीस


पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न

आप नेते हरपाल सिंग चीमा, डॉ बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, डॉ विजय सिंगला यांनी पंजाब मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.


देशात आज 2075 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 71 रुग्णांचा मृत्यू


पंजाब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी सोहळा, १७ पैकी १० मंत्री घेणार शपथ

चंडीगढमध्ये शपथविधी सोहळ्याचे आयोजन

मंत्र्यांच्या शपथविधीनंतर दुपारी 12.30 वाजता भगवंत मान यांची पंजाब सचिवालयात पहिली कॅबिनेट बैठक


विदर्भ, मराठवाड्यात आज तीव्र उष्णतेची लाट

विदर्भ आणि मराठवाड्यात आज तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे. विदर्भातील अकोल्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद होणार असून तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.


भाजप नेते राजू शेट्टी यांच्या भेटीला

महाविकास आघाडी सरकारवर नाराज राजू शेट्टी यांची भाजपच्या नेत्यांनी घेतली भेट


राज्यातील धरणांमध्ये 67 टक्के पाणी साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा जास्त