Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा...

Live Update: वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा निर्णय

Subscribe

वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा निर्णय

संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्याने घेतला निर्णय

- Advertisement -

सर्व वीज कर्मचारी संघटनासोबत उद्या ३ वाजता ठरली होती बैठक

मेस्माची कठोर अंमलबजावणी करणार

- Advertisement -

राज्य सरकारची घोषणा

वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही

राज्य सरकारची ग्वाही


इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना कोरोनाची लागण


मुंबई गेल्या २४ तासांत ५० नवे कोरोनाबाधित आढळले असून एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या मुंबईत २९० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातील बैठक संपली. सार्वजनिक बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली.


ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.


टोकियो ऑलम्पिक गोल्ड मॅडलिस्ट नीरज चोप्राने पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला.


टोकियो पॅराओलम्पिक गोल्ड मॅडलिस्ट शटलर प्रमोद भगत यांना पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले.


भाजपचे माजी नेते लाते कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मुलगा राजवीर सिंग यांनी या पुरस्कार घेतला.


आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यासाठी चिपी विमान तळावर दाखल


मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात घेतली धाव 


इंधन दरवाढीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु


प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली गोव्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ


प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल  


देशात कोरोनाचे 1270 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली 15,859 वर


प्रमोद सावंत आज घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आज प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सलग दुसऱ्यांदा ते गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


प्रवीण दरेकर हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.


वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लावला मेस्मा


 

- Advertisment -