घरदेश-विदेशगुजरातमध्ये ७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू प्रमाणपत्रे तयार, सरकारी आकडा मात्र ४...

गुजरातमध्ये ७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू प्रमाणपत्रे तयार, सरकारी आकडा मात्र ४ हजार

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा वाढत आहे, दरम्यान कोरोनाची दहशत गेल्या वर्षभरापासून कायम आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर यांसारख्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून मृत्यूदर देखील वाढताना दिसतोय. कोरोना रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शवगृहात मृतदेहांची रांग लागली असल्याचे सांगितले जात आहे. तर असे असतानाही सरकारकडून मृतांचा खरा आकडा लपविण्यात येत आहे. दैनिक भास्करने गुजरातमधील मृतांच्या आकडेवाडीसंदर्भात एक बातमी दिली आहे. गुजरातमधील १ मे ते १० मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे.

या आकडेनुसार, राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये ७१ दिवसांत १ लाख २३ हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवाडीनुसार कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या फक्त ४ हजार २१८ एवढीच दाखवण्यात येत आहे. त्यामुळे, ७१ दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील मृत्यू प्रमाणपत्रांच्या आकडेवाडीनुसार यंदाच्या मार्च महिन्यातच २६ हजार २६, एप्रिल महिन्यात ५७ हजार ७९६ आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या १० दिवसांत ४० हजार ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीसोबत यंदाची तुलना केल्यास मोठी तफावत जाणवते. मार्च २०२० मध्ये २३ हजार ३५२ एप्रिलमध्ये २१ हजार ५९१ आणि मे २०२० मध्ये १३ हजार १२५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ७१ दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४३ हजार १४४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ६२ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७९ हजार ५९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -