घरताज्या घडामोडीGood News: देशात कोरोनावर दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरु

Good News: देशात कोरोनावर दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरु

Subscribe

देशात कोरोनावर दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरु झाली आहे.

देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून बाधितांचा आकडा ९ लाखांवर पोहोचला आहे. मात्र, मृतांची संख्या कमी असल्याने काहीसा ताण कमी झाला आहे. त्यातच एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाच्या पहिल्या कोरोना लसीची (COVAXIN) माणसांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली असून आता देशात कोविडवर दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. डीएनए लस झायकोव्ह-डीची (zycov-D) ची मानवी चाचणी सुरु केली आहे. भारतातील औषध निर्मिती करणारी कंपनी झायडस कॅडिला या कंपनीने ही लस तयार केली असून या डीएनए लसीचा पहिला डोस एका रुग्णाला चाचणी प्रक्रियेअंतर्गत देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी गेल्या महिन्यात या कंपनीला मानवी चाचणीसाठीची मंजुरी दिली होती.

स्वयंसेवकांवर करण्यात आली मानवी चाचणी

कंपनीच्या माहितीनुसार; ही पहिली मानवी चाचणी एक हजार स्वयंसेवकांवर सुरु करण्यात आली आहे. या मानवी चाचणीचे दोन्ही टप्पे एका पाठोपाठ एक पूर्ण केले जाणार आहे. झायकोव्ह-डी, प्लाझमिड डीएनए लस सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासंदर्भातील चाचणीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

- Advertisement -

क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री – इंडिया (सीटीआरआय) नुसार, दोन टप्प्यात चाचणी केली जाणार असून पहिल्या टप्प्यात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील निरोगी पुरुष आणि महिलांवर ही चाचणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ही चाचणी १२ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही निरोगी स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे.


हेही वाचा – तिरुपती देवस्थानच्या १४ पुजाऱ्यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -