Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे कोरोनाचा वाढतोय कहर, WHOचा इशारा

corona pandemic again increase because of russia ukraine war who warn
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे कोरोनाचा वाढतोय कहर, WHOचा इशारा

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १७वा दिवस आहे. या युद्धामुळे आर्थिक नुकसानसोबत जीवितहानीही होत आहे. एवढेच नाही तर आता कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. कारण युद्धादरम्यान युक्रेनमधील मोठ्या प्रमाणात लोकं पलायन करत आहेत. तसेच युरोपसह अनेक देशांमधील लोकं वेगवेगळ्या देशात जात आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कारण हे लोकं ज्या परिस्थितीत पलायन करत आहेत, अशात कोरोना चाचणी करणे शक्य नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना महामारीचा धोका वाढत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काल शुक्रवारी म्हटले की, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कोरोनाचे संकट वाढत आहे. बचावकार्य दरम्यान लोकांच्या हालचाली वाढल्या आहेत. यासोबत दोन्ही देशांमध्ये लसीकरण, उपचार आणि कोरोना चाचण्या यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यापूर्वी नायजेरियाने इशारा दिला होता. नायजेरियन आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले आहे होते की, ‘आम्ही युक्रेनमधील ज्या लोकांना बाहेर काढले आहे, त्यामध्ये ६० लोकं कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे आता नायजेरियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ११८वर पोहोचली आहे.’

अमेरिकेतही पुन्हा कोरोनाचे संकट वाढले

अमेरिकेच्या पेन्सिलवेनियामध्ये संशोधनकर्त्यांनी ९३ मृत्यू हरणांचा तपास केला. त्यामध्ये असे आढळले की, प्रत्येक ५ हरणांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळले होते. आता ज्या कोरोना संक्रमणामुळे हरणांचा मृत्यू झाला, तो मनुष्यासाठी धोकादायक आहे का? याचा तपास केला जात आहे.

चौथ्या लाटेचा वाढू शकतो धोका

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतु जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चौथ्या लाटेची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वायरोलॉजिस्ट डॉ. टी जॅकब जॉन म्हणाले की, ‘जर कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आला नाही, तर भारतात चौथी लाट येणार नाही.’


हेही वाचा – Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका झाला मालामाल, तर चीनची झाली चांदी