Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE लज्जास्पद! कोरोना महामारीत पोटच्या मुलांकडूनच जन्मदात्यांची हालअपेष्टा, हेल्प एज इंडियाचा अहवाल

लज्जास्पद! कोरोना महामारीत पोटच्या मुलांकडूनच जन्मदात्यांची हालअपेष्टा, हेल्प एज इंडियाचा अहवाल

सर्वेक्षण अहवालानुसार, ४८.७ टक्के वृद्धांनी असे सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात त्यांच्यावर पोटच्या मुलांकडून हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीने आपले आणि परके याची फार प्रखरशाने जाणीव करुन दिली. चांगल्या काळात साथ देणाऱ्यांनी संकट काळात पाट फिरवली. देशात नाही तर जगभरातील लोक या अनुभवाला सामोरे गेले आहेत. परक्यांपेक्षा रक्ताच्या नात्यांनीही या महामारीत आपले खरे रंग दाखवले. कोरोना व्हायरस हा सर्वात धोकादायक होता तो म्हणजे वृद्धांना. भयानक विषाणू सोबत या काळात वृद्धांना अनेक संकटांना समोरे जावे लागले. हेल्प एज इंडियाद्वारे वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, ४८.७ टक्के वृद्धांनी असे सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात त्यांच्यावर पोटच्या मुलांकडून हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७४.४ टक्के वृद्धांशी कोरोना काळात गैरव्यवहार, अनादर झाल्याचे समोर आले. कोरोना काळात वृद्धांसोबत घडलेल्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत.

हेल्प एज इंडियाच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, २५.६ टक्के वृद्धांना त्यांच्या जन्मदात्या मुलांकडून थोबाडीत मारल्याचे सांगिलते.  तर ३० टक्के वृद्धांच्या मते त्यांच्यासोबत मौखिक दुर्व्यवहार झाल्याचे समोर आले. यातील १७ टक्के वृद्दांच्या मते त्यांचे आर्थिक शोषण केल्याचे सांगितले. तर ३४ वृद्धांचे कोरोना महारीत त्यांच्या मुलांकडून योग्य देखभाल झाली नाही. आई वडिलांसोबत वागण्याची त्यांची पद्धत पूर्णपणे बदल्याचे जाणवले. रिपोर्टनुसार आतापर्यंत ६६ टक्के वृद्धांनी कोरोना लस घेतली आहे. तर ३३ टक्के वृद्धांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

- Advertisement -

हेल्प एज इंडियाच्या सर्वेक्षणात, आपल्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची करण्यासाठी कंटाळे होते. वृद्धांची सेवा करणाऱ्या ६० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितेल की कोरोना काळात आवश्यक वस्तू आणि सेवा मिळवणे अत्यंत कठीण झाले होते. कोरोना काळात वृद्धांचे जेवण, किराणा सामान आणिी औषधांसारख्या महत्त्वाच्या वस्तू मिळणे देखील कठीण झाले होते. या काळात वृद्धांसोबतच त्यांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागला.


हेही वाचा – Coronavirus: डेल्टा व्हेरियंटमुळे लोकांना दुप्पट वेगाने होतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासातून नवा खुलासा

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -