घरCORONA UPDATEकोरोना रूग्णाला वॉर्डमध्ये कुत्र्याबरोबर ठेवून कर्मचारी गायब!

कोरोना रूग्णाला वॉर्डमध्ये कुत्र्याबरोबर ठेवून कर्मचारी गायब!

Subscribe

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील अनेक राष्ट्र अद्याप या प्राणघातक विषाणूंशी झगडत आहे. त्याच बरोबर अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत जिथे स्वतः रूग्णालयातील कर्मचारीदेखील दुर्लक्ष करत आहेत. अशीच एक घटना गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून समोर आली आहे. इथल्या वांकनेर येथील रूग्णालयात कोरोना विभागात कोरोनाचा एक रुग्ण ठेवण्यात आला होता. पण कर्मचारी त्या वॉर्डमध्ये कुलूप लावून गायब झाले.

आश्चर्य म्हणजे वॉर्डमध्ये एक कुत्रा होता. जिथे त्या महिलेला कुलूप लावून ठेवण्यात आळे होते. याच ठिकाणी तो कुत्रा होता. या घटनेचे फोटोही समोर आले आहेत. महिलेला दवाखान्यातून सोडण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

- Advertisement -

खरतर  दहा दिवसांपूर्वी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलैला या महिलेला कुत्र्याबरोबर वॉर्डामध्ये बंद करण्यात आलं आणि कर्मचार्‍यांना कुलूप लावले. ही घटना उघडकीस आल्यानंतर अद्याप याबाबतचे अधिकृत विधान समोर आले नाही. या महिलेने सांगितले मी आतून आवाज देत होते पण माझं कोणीच ऐकलं नाही.


हे ही वाचा – अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिलं – RBI


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -