घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख पार तर ४० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाख पार तर ४० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. एकाबाजूला जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढताना दिसत आहे. जगभरातील ८१ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ८१ लाख १२ हजार ६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ४ लाख ३९ हजार ५१ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर आतापर्यंत ४० लाख ७ हजार ३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा २१ लाखांहून अधिक असून १ लाख १८ हजार २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकनंतर ब्राझील, रशिया, भारत, ब्रिटन या देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जगातील ९ देशांमध्ये कोरोनाचे १ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तर ४ देशांमध्ये २ लाखांहून अधिक रुग्ण आहेत.

- Advertisement -

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,१८२,९५० – मृत्यू – ११८,२८१ 
ब्राझील : कोरोनाबाधित – ८९१,५५६ – मृत्यू – ४४,११८
रशिया : कोरोनाबाधित – ५३७,२१० – मृत्यू – ७,०९१ 
भारत : कोरोनाबाधित – ३४३,०२६ – मृत्यू – ९,९१५
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९६,८५७ – मृत्यू – ४१,७३६
स्पेन : कोरोनाबाधित – २४४,१०९ – मृत्यू – २७,१३६
इटली : कोरोनाबाधित- २३७,२९० – मृत्यू – ३४,३७१
पेरू : कोरोनाबाधित – २३२,९९२ – मृत्यू – ६,८६०
इराण : कोरोनाबाधित – १८९,८७६ – मृत्यू – ८,९५०
फ्रान्स : कोरोनाबाधित – १८९,६०२ – मृत्यू – २९,४३६


हेही वाचा – जगात २४ तासांत १६३ हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के, १४ देशांमध्ये भूकंप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -