घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona: देशात लस उपलब्ध नाही तरीही या देशांनी परत पाठवले लसीचे डोस,...

Corona: देशात लस उपलब्ध नाही तरीही या देशांनी परत पाठवले लसीचे डोस, काय आहे कारण?

Subscribe

जगभरात ओमीक्रॉनबरोबरच पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढल्याने अनेक देशांनी लसीकरणावर जोर दिला आहे. मिळेल ती लस नागरिकांना देऊन देश कोरोना मुक्त करण्याचा प्रयत्न सर्वच करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ३० गरीब देशांनी मात्र लसीकरणाकडेच पाठ फिरवली असून दुसऱ्या देशांनी वैद्यकिय मदत म्हणून पाठवलेले कोट्यवधी लसीचे डोस परत केले आहेत. गेल्या सहा महिन्यात तब्बल १० कोटी लसीचे डोस घेण्यास या देशांनी नकार दिल्याचे युनिसेफने सांगितले आहे. या नकाराचे कारण लसी ठेवण्यासाठी या देशांकडे कोल्ड स्टोरेज नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून सध्या जगभरातील गरीब आणि लहान देशांपर्यंत कोरोना लस पुरवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेस COVAX कोवॅक्स असे नाव देण्यात आले आहे. आर्थिकदृष्टया पिचलेल्या देशांना मोफत कोरोना लशींचा पुरवठा करण्यात येत आहे.  COVAX मोहीमेतंर्गत तब्बल १५० देशांना अब्ज डोस पुरवण्यात येत आहेत. मात्र यातील ३० देशांनी या लसी घेण्यास नकार दिला आहे. याबद्दल युनिसेफचे पुरवठा विभागाचे संचालक एत्लेवा कैडिली (Etleva Kadilli) यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार गरीब देशांनी डिसेंबर महिन्यात १० कोटी लसीचे डोस परत केले आहेत. लस ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोरेज फ्रीज या देशांकडे नसल्याने त्यांनी नकार दिल्याचे कैडिली यांनी सांगितले आहे. पण आतापर्यंत या देशांमधील किती जणांनी लस घेतली याबद्दल मात्र माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे जगभरात ओमीक्रॉनबरोबरच कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. याचपार्श्वभूमीवर, WHO ने covax मोहिम सुरू केली आहे. पण जर गरीब देशांनी अशा प्रकारे लस घेण्यास नकार दिला तर कोरोना महामारीचा अंत करणे आव्हानात्मक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान लसीच्या पुरवठ्यावर आणि वापरावर लक्ष ठेवणारी CARE या संस्थेने यावर सर्वेक्षण केले. त्यानुसार आतापर्यंत ज्या गरीब देशांना लसीचा पुरवठा केला गेला त्यातील ९० देशांनी जवळजवळ ६८ कोटी लसी वापरल्या आहेत. तर काँगो आणि नायजेरिया साऱख्या ३० हून अधिक गरीब देशांनी अर्ध्याहूनही कमी लस घेतल्या आहेत.

तर GAVI या संस्थेच्या माहितीनुसार कोवॅक्स मोहिमेंतर्गत जगभरातील १४४ देशांमध्ये ९८ कोटींहून अधिक लसीकरण झाले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार जानेवारीपर्यंत श्रीमंत देशांतील लोकसंख्येच्या ६७ टक्के नागरिक लसवंत आहेत. तर गरीब देशांमध्ये लोकसंख्येच्या अवघे ८ टक्के लसीकरण झालेले आहे.

- Advertisement -

तर युनिसेफच्या मते युरोपियन युनियन देशांनी दिलेल्या लसीपैंकी १.५ कोटी लस परत देण्यात आली आहे. यातील एक तृतीयांश लस या एस्ट्राजैनेकाच्या असून त्या दहा आठवड्यांनी कालबाह्य( expiry date) होणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्यानेही यावर भाष्य केले होते. श्रीमंत देश कमी कार्यकाल असलेल्या लसी गरीब देशाला दान करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात अशाच कमी कार्यकाल असलेल्या १० लाख लसी वापराविना पडून असल्याने कालबाह्य झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -