घरताज्या घडामोडीCoronavirus: लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता कहर! १०० पैकी २० मुलांना संसर्ग होण्याचा...

Coronavirus: लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता कहर! १०० पैकी २० मुलांना संसर्ग होण्याचा धोका

Subscribe

कर्नाटकात लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका अधिक

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं अडकतं आहेत. लहान मुलांना दुसरी लाट घातक असल्याचे सांगितले जात आहे. याच अनुषंगाने नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रौढांप्रमाणेच होत आहे. जवळपास २० ते २२ टक्के मुलांना संसर्ग होण्याचा धोका आहे. याला आयसीएमआरने देखील एका अभ्यासातून दुजोरा दिला आहे. म्हणजेच १०० पैकी २० मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असून शकतो. त्यामुळे मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रौढांप्रमाणेच काळजी घेतली पाहिजे. लोकांनी घाबरण्याऐवजी नियमांनुसार स्वतःची आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असतील तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो.’

दरम्यान डॉ. पॉल यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे की नाही? याबाबत माहिती दिली नाही. ही तिसरी लाट येणार की नाही? याबाबत काही सांगितले जाऊ शकत नाही, असे डॉ. पॉल म्हणाले. तसेच त्यांना सिंगापूरमधून कोणता स्ट्रेन आला आहे की नाही? याबाबत देखील त्यांनी माहिती दिली नाही.

- Advertisement -

मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधून आलेल्या स्ट्रेनचा हवाला देत लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. यावेळीस त्यांनी सिंगापूरमधून आलेल्या स्ट्रेनच्या नावाचा उच्चार केला नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या राज्यातील एका लॅबमध्ये जिनोम सिक्वेसिंग नाही आहे आणि ज्यांनी आतापर्यंत ५० लाखांपैकी १० हजार नमुन्यांची जिनोम सिक्वोसिंग केली नाही आहे, अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे कमी माहितीसोबत काही बोलले नाही पाहिजे.

कर्नाटकात लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली प्रमाणे येथे देखील तिसरी लाट दिसत आहे. पहिल्या लाटेदरम्यान ९ मार्चपासून ते २५ सप्टेंबर २०२० दरम्यान १० वर्षांच्या लहान मुलांच्या १९ हजार ३७८ केसेस होत्या आणि ११ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांच्या ४१ हजार ९८५ केसेस समोर आल्या होत्या. मागील दिवसात म्हणजेच १ ते १६ मे दरम्यान १९ हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. १० वर्षांच्या लहान मुलांमध्ये पोट दुखी, पुरळ आणि इतर त्वचा रोगाची लक्षणे आढळत आहे. याच अनुषंगाने पत्रकार परिषदमध्ये विचारलेल्या प्रश्नाला डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘आयसीएमआर सातत्याने लहान मुलांबाबत माहिती देत आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकला १८ पेक्षा कमी वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. पुढील दोन आठवड्यात लहान मुलांवर लसीच्या चाचणीला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या लोकांनी यावेळी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – BJP नेत्यांचा अनोखा फंडा; कोरोनाला पळविण्यासाठी गल्लोगल्ली शंख नाद आणि अंगारे धुपारे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -