घरताज्या घडामोडीगणेशोत्सव, दिवाळी साजरी करा पण कोरोनाचे नियम पाळून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा

गणेशोत्सव, दिवाळी साजरी करा पण कोरोनाचे नियम पाळून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा

Subscribe

सणवार साजरे करताना कोरोनाचे नियम पाळा असा इशाराच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने नागरिक निश्चिंत होत असतानाच दुसरी लाट अजून ओसरलेली नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सणवार साजरे करताना कोरोनाचे नियम पाळा असा इशाराच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सध्याच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही असे सांगितले. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सणवार असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे सण साध्यापद्धतीने घरात साजरे करा. असा इशाराच भूषण यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी होते. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. असे असले तरी मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी केरळमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. केरळमध्ये ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत. ही चिंतेची बाब असल्याचेही भूषण यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -