Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला बसणार फटका - IMF

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला बसणार फटका – IMF

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर वाईट परिणाम झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट जगभरात येत आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसताना दिसतोय. कारण अर्थव्यस्थेच्या उभारीचा वेग पुन्हा एकदा मंदावला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. IMF च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनी जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थे असलेल्या देशांच्या नेत्यांशी व्हर्च्युअल बैठकीसाठी एक अहवाल तयार केला आहे.

IMF च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनी म्हटले आहे की, एकीकडे कोरोना लसीची सुखद बातमी येत असताना अर्थव्यवस्था उभारणीचा वेग मंदावला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले जात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावणार असून सार्वजनिक कर्जात वाढ होणार आहे. शिवाय, कोरोनाचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर बराच काळ असणार आहे.

जी-२० शिखर परिषद सौदी अरेबियामध्ये

- Advertisement -

सौदी अरेबिया या आठवड्यात जी-२० व्हर्च्युअल मीटिंगचे आयोजन करीत आहे. या बैठकीचे मुख्य लक्ष जागतिक अर्थव्यवस्थेला स्थिर करणे आणि पुढील वर्षी यास गती देणे याकडे असेल. गेल्या महिन्यात, IMF चा अंदाज आहे की यावर्षी जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्के दराने घसरणार आहे. यानंतर अर्थव्यवस्थेला उभारी येईल आणि पुढच्या वर्षी ५.२ टक्क्यांनी वाढेल.

 

- Advertisement -