घरCORONA UPDATEcorona second wave : कोरोनाच्या बदलत्या स्ट्रेनमुळे ३ टक्के मुलांना करावे लागले...

corona second wave : कोरोनाच्या बदलत्या स्ट्रेनमुळे ३ टक्के मुलांना करावे लागले रुग्णालयात दाखल

Subscribe

रुग्णालयांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था वाढवण्यावर भर

देशात सध्या कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यात लहान मुलांनाही आता कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या बहुतेक कोरोनाग्रस्त लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत. परंतु येणाऱ्या काही दिवसांत कोरोना विषाणुच्या बदलत्या स्ट्रेनमुळे लहान मुलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच जवळपास २ ते ३ टक्के लहान मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते . त्यामुळे प्रत्येक राज्यांना आता लहान मुलांसाठी वैद्यकीय आरोग्य व्यवस्था वाढण्याचे निर्देश दिले जात आहेत.

आत्तापर्यंत वयस्कर, प्रौढ रुग्णांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे सांगितले जात होते, पण यात लहान मुलांनाही कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे किंवा तशी प्रकरणे समोर आली असल्याची कोणताही माहिती केंद्र सरकारने दिली नव्हती. परंतु कोरोना विषाणुच्या बदलत्या स्ट्रेनचा लहान मुलांनाही धोका निर्माण झाल्याने केंद्र सरकारने पहिल्यांदाच कोरोना विषाणु्च्या नव्या स्ट्रेनवर अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर काम करण्यास सुरु केले आहे.

- Advertisement -

रुग्णालयांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था वाढवण्यावर भर

नीति आयोगाचे सदस्य डॉ.वीके पॉल यांनी सांगितले की, लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र्य वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील १ ते २ दिवसांत राज्यांना पाठविली जातील. रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था वाढविण्यावर भर दिला जाईल. सध्या लहान मुलांना संसर्गाचा धोका असला तरी गंभीर प्रकरणे फार कमी आहेत. कारण बहुतेक मुले कोरोना संसर्गानंतर बरे होऊन घरी परतत आहेत.

नॅशनल टास्क फोर्सने जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा अभ्यास, कोरोना विषाणुचा नवा व्हेरियंट आणि कोरोना महामारीचा होणारा प्रभाव यावर जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी प्रत्येक जिल्हा पातळीवर काम करावे लागेल असा निर्णय घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून बालरोग सेवा वाढविण्यात भर दिला जाणार आहे. तसेच प्रौढ कोरोनाबाधित रुग्णांप्रमाणे लहान मुलांनाही कोरोना संसर्गापासून वाचवता येईल असे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर लहान मुलांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी पालकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडसह इतर वैद्यकीय सेवा वाढविण्यावर भर दिला जाईल. या व्यतिरिक्त, मुलांच्या लसीकरणाबद्दल अभ्यास सुरु असून लवकरचं लहान मुलांनाही लस दिली जाऊ शकते.

- Advertisement -

कोरोनातून बरे होणाऱ्या मुलांना एमआयएस-सीचा धोका

कोरोनातून बरे होणाऱ्या लहान मुलांना आता मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेट्री सिंड्रोम (एमआयएस-सी) आजाराचा धोका निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे कोविड पोस्ट आजार आहे. त्यावेळी जर आपण मुलांची कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी केल्यास ती निगेटिव्ह येईल. परंतु अँटीबॉडीच्या चाचणीत ते मुलं कोरोना संसर्गातून बरे झाल्याचे समजेल. यात २ ते ६ आठवड्यांनंतर अशा मुलांमध्ये बरीच लक्षणे दिसू लागली आहेत. त्याचे उपचार उपलब्ध आहेत परंतु वेळेवर लक्षणे समजणे महत्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे.


उत्तरप्रदेशात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू तर १४ हून अधिक जखमी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -