देशातील कोरोना परिस्थिती बिकट, केंद्र सरकारकडून लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा – पी. चिदंबरम

तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना लसीचा पहिला डोसही मिळाला नाही

Corona situation danger in the country p. Chidambaram slams central government
देशातील कोरोना परिस्थिती बिकट, केंद्र सरकारकडून लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा - पी. चिदंबरम

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने देशातील परिस्थितीत अतिशय बिकट झाली आहे. यावरु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला आहे. देशाती वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीवर पी.चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेवरही चिदंबरम यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाी परिस्थिती बिकट झाली असल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटलंय की, कोरोना लसींचा अपुरा पुरवठा हे कटू सत्य आहे. परंतु केंद्र सरकार नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना लसीचा पहिला डोसही मिळाला नाही आहे.

तसेच लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. १८ ते ४४ वयोगटातील कोणत्याही नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला नाही आहे. देशातील बाकिच्या राज्यांची परिस्थिती वेगळी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन आपल्या जबाबदारीपासून हात झटकत आहेत. लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरु केली जात असल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी आता एकत्र यावे लागणार आहे. तसेच काँग्रेस पक्ष या कोरोना संकटात देशातील नागरिकांच्या सोबत आहे. सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. केंद्र सरकारला आपली नैतिकता आणि आपल्या जबाबदाऱ्या झटकताना पाहून आश्चर्य वाटले आहे. मोदी सरकार लसीकरणामध्ये लाखो आदिवासी आणि मागास वर्गातील नागरिकांना वंचित ठेवू शकते.