घरCORONA UPDATEकोरोनामुळे सैनिकांची शिस्त बिघडली? आर्मी कट करायला न्हावीच मिळेना!

कोरोनामुळे सैनिकांची शिस्त बिघडली? आर्मी कट करायला न्हावीच मिळेना!

Subscribe

लॉकडाऊन सुरू होऊन १ महिना पुर्ण झाला आहे. त्यामुळे सैनिकांचे केस वाढायला सुरूवात झाली आहे.

भारत देशाचे सैनिक आणि त्यांची शिस्त संपूर्ण देशाला माहिती आहे. प्रत्येकवेळी या सैनिकांच्या शिस्तीच उदाहरण दिलं जातं. मात्र या कोरोना व्हायरसच्या काळात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा परीणाम सैनिकांच्या शिस्तीवरही झालेला दिसून येत आहे. भारतील सैन्यातील शिस्तीमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, सैनिकांचे बारीक कापलेले केस. पण आता लॉकडाऊनमुळे सलून बंद असल्यामुळे सैनीकांना प्रश्न पडला आहे.. आता ते शिस्त कशी पाळू शकणार आहेत? कारण लॉकडाऊनमध्ये सलून उघडायला परवानगी नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे.

१५ लाखांहून अधिक सैनीक आणि अधिकारी त्यांच्या आर्मी हेअरस्टाईलमुळे ओळखले जातात. मात्र या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सैनिकांचे केस वाढत आहेत. सैनिकांच्या युनीटमध्ये साधारण १८०० सलूनची दुकानं आहेत. मात्र ती सगळी दुकानं आता बंद आहेत. या दुकानांना उघडण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये.

- Advertisement -

लॉकडाऊन सुरू होऊन १ महिना पुर्ण झाला आहे. त्यामुळे सैनिकांचे केस वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्यांचा आर्मी कट आता राहिला नाहीये. अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.

कोणताही नवीन सैनिक ड्यूटीवर येतो तेव्हा त्याला ३० नियमांच पालन करणे अत्यावश्यक आहे. यात छोटे केस असणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक सैनिक त्याचे पालन करतात.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘या’ कारणामुळे रामायणातील राम सरकारवर नाराज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -