घरCORONA UPDATECorona Steroid : कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक स्टेरॉइंट्सचे गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

Corona Steroid : कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक स्टेरॉइंट्सचे गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

Subscribe

सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेशी झगडत आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी अद्याप मृतांचा आकडा वाढतच आहे. यात आता कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक स्टेरॉइंट्सचे गंभीर परिणाम दिसत असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. मेयो क्लिनिकचे एमडी विंन्सेंट राजकुमार यांनी उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अति स्टेरॉइट्ससंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. राजकुमार आपल्या ट्विटर अकाउंटवरून स्टेरॉइट्सच्या वापराविषयी सतत माहिती देत ​​असतात.

विंन्सेंट राजकुमार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतात असे अनेक कोरोनाबाधित तरुणांचा मृत्यू होत आहेत जे सहजपणे बरे व्हायला हवे होते. मी भारतीय डॉक्टरांना विनंती करतो की, कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइंटसचा वापर कमी करावा, कारण स्टेरॉइंटस या केवळ हायपोक्सिक रुग्णांसाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यादरम्यान स्टेरॉइंट्स देणे धोकादायक ठरू शकते.

- Advertisement -

राजकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, ‘कोरोना संसर्ग झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात हा विषाणू शरीराभर पसरतो. अशा परिस्थितीत रुग्णाला स्टेरॉइट्स दिल्यास रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर दबाव वाढतो आणि विषाणू शरीरात अधिक वेगाने पसरतो. कारण स्टेरॉइंट्स हे अँटीवायरस ड्रग्स नाही. त्यामुळे रिकव्हरी दरम्यान हायपोक्सिक नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा अधिक मृत्यू होत आहे. कारण कोरोनाबाधित रुग्णांमधील हायपोक्सिया रुग्णाच्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग अधिक होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीमुळे होणारे नुकसान नियंत्रित केले जाऊ शकते. केवळ हायपोक्सियामध्येच रुग्णाला स्टेरॉइटचे कमी डोस दिले जाऊ शकतात. तसेच त्यांनी सांगितले की, रिकव्हरीदरम्यान जास्तीत जास्त ५ दिवसापर्यंत रुग्णाला डेक्सामॅथासोन 6mg दिले जाऊ शकते,

मेयो क्लिनिकच्या एमडी राजकुमार यांनी स्टेरॉइट्सच्या उच्च डोस आणि अनेक दिवस दिल्या जाणाऱ्या डोसमुळे होणारा धोका यांची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘स्टेरॉइटसचे हाई डोस जास्त काळ रुग्णास चालू ठेवल्यास शरीरातील इतर अनेक इंफेक्शनचा धोका वाढतोय. यात म्युकरमाक्रोसिस, औषधप्रतिरोधक बुरशीजन्य आजार, औषधप्रतिरोधक विषाणुचा धोका वाढतोय. तर स्टेरॉइट्सचा जास्त वापर केल्याने स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी स्टेरॉइट्सचा जास्त वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रूग्णांना इतरही अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. राजकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वाढू शकतो आणि यासमोर आरोग्य यंत्रणाही बिघडू शकते. त्यामुळे परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांवर स्टेरॉइंट्सचा वापर गरज असेल तरचं करत योग्यवेळी योग्यती काळजी घेतली पाहिजे.

- Advertisement -

दरम्यान एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही अनेकदा स्टेरॉइट्सचा अतिवापरामुळे कोरोनाबाधि रुग्णास धोका निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. याच जे रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेत आहेत त्यांना स्टेरॉइटसचे अति डोस दिल्यास त्यांचा फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असे सांगत कोरोना संक्रमणादरम्यान औषधांचा गैरवापर करण्याबाबत कडक इशारा दिला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -