घरCORONA UPDATEVideo : हे सगळंच धक्कादायक आहे; टार्गेटसाठी केलं जातंय कोरोनाचं 'Fake Sampling'!

Video : हे सगळंच धक्कादायक आहे; टार्गेटसाठी केलं जातंय कोरोनाचं ‘Fake Sampling’!

Subscribe

कोरोना काळात किती चाचण्या झाल्या, किती चाचण्या करायला हव्या यावरून बराच वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये आणि राज्या-राज्यांमध्ये देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच, कुणी किती चाचण्या केल्या, याचे दावे-प्रतिदावे देखील केले जात आहेत. मात्र, या काळात फक्त सरकारने दिलेलं चाचण्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही आरोग्य केंद्रांवर Fake Sampling होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या केल्याचे दावे सरकारी पातळीवरून जरी केले जात असले, तरी वास्तवात तेवढ्या टेस्ट खरंच झाल्या आहेत का? असा प्रश्न या व्हिडिओनंतर उपस्थित होऊ लागला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं या व्हिडिओमागच्या वास्तवाचं वृत्त दिलं आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातला आहे. मथुरा जिल्ह्यातल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमधला एक डॉक्टर तिथल्या आरोग्य सेवकाला स्वत:चेच सॅम्पल्स घ्यायला सांगत आहे. या डॉक्टरचं ना राजकुमार सारस्वत आहे. आरोग्य सेवकानं डॉक्टर राजकुमार सारस्वतचे एकापाठोपाठ १५ सॅम्पल्स घेतले. विशेष म्हणजे हा आरोग्यसेवक डॉक्टरला ‘तुम्ही स्वत:चे इतके सॅम्पल्स घेऊ नका. त्यामुळे अडचणीत याल’, असं सांगतानाही दिसत आहे. मात्र, तरीदेखील हे ‘सॅम्पलिंग’ सुरूच आहे.

- Advertisement -

व्हिडिओमागचं वास्तव

राज्य सरकारकडून सर्व आरोग्य केंद्रांना चाचण्यांचे टार्गेट दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष बाहेर जाऊन सॅम्पल घेण्याचा त्रास वाचावा म्हणून हे डॉक्टर महाशय स्वत:चेच सॅम्पल वेगवेगळ्या बनावट नावांनी लॅबला टेस्टिंगसाठी पाठवत आहेत. तसेच, याच चाचण्यांची आकडेवारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाला देखील पाठवली जात आहे. याच कम्युनिटी हेल्थ सेंटरचे दुसरे डॉक्टर अमित यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. डॉ. अमित यांच्यानुसार, या कम्युनिटी हेल्थ सेंटरचे प्रमुख डॉ. योगेंद्र सिंह राणा यांच्याकडून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अशा फेक चाचण्या घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जर अशा चाचण्या केल्या नाहीत, तर कर्मचाऱ्यांचं कंत्राट रद्द करण्याची धमकी देखील दिली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

या घटनेचा हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे:

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -