Corona : कोरोनाची तिसरी लाट आलीच ! टास्क फोर्सचा मोठा खुलासा

देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे मोठे विधान कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

Corona: The third wave of Corona! Big revelation of the task force
Corona : कोरोनाची तिसरी लाट आलीच ! टास्क फोर्सचा मोठा खुलासा

गेले दोन वर्ष संपूर्ण जग हे कोरोनाच्या गर्तेत अडकले होते.मात्र,कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच,कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन डोके वर काढत आहे. हा ओमिक्रॉन धुमाकुळ घालत असताना कोरोनाच्या टास्क फोर्सने एक मोठा खुलासा केला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे मोठे विधान कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितले आहे. 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता.त्यानंतर या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला.

ओमिक्रॉनच्या रुग्णांमधील 75 टक्के रुग्ण मुंबई,कोलकत्ता आणि दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आहे. देशात आतापर्यंत 1700 ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यामधील महाराष्ट्रात 510 रुग्ण आढळून आले आहे. डॉक्टर एन के अरोरा यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरुन देशात कोरोनाची तिसरी लाट लागली आहे हे स्पष्ट होत आहे,असे अरोरा यांनी सांगितले आहे. याशिवाय डॉक्टर अरोरा यांनी किशोरवयीन मुलांना देण्यात येणारी लस ही असुरक्षित असल्याचा दावा फेटाळला आहे.

मुंबईत लॉकडाऊन होणार ? 

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही आतापासूनच कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेनं वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तयारी केलीय. वाढत्या कोरोना रुग्ण पाहता मुंबईत लॉकडाऊनही होण्याची शक्यता मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केलीय. मुंबईत रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्या वर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इक्बाल चहल यांनी सांगितलं. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीय, त्यावेळी ते बोलत होते.


हेही वाचा – Corona Virus : अतुल भातखळकरांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती