घरCORONA UPDATECorona Update: देशात मृत्यूचा तांडव सुरुच; २४ तासांत ४१२० जणांचा मृत्यू, ३.६२...

Corona Update: देशात मृत्यूचा तांडव सुरुच; २४ तासांत ४१२० जणांचा मृत्यू, ३.६२ लाख नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

देशात कोरोनामुळे दिवसाला ४ हजारांहून अधिक जणांचा जीव जात आहे. आतापर्यंत २ लाख ५८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ६२ हजार ७२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५३ हजार १८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाख ३ हजार ६५५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ५८ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झआले आहेत. सध्या ३७ लाख १० हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आतापर्यंत देशातील १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशात १२ मेपर्यंत ३० कोटी ९४ लाख ४८ हजार ५८५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. त्यापैकी काल दिवसभरात १८ लाख ६४ हजार ५९४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात काल (बुधवार) ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंद झाली. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. राज्यात काल ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ४६ हजार १२९ वर पोहोचली आहे.


हेही वाचा – भारत लोकसंख्येत २०२७ पूर्वीच चीनला मागे टाकणार, UNच्या अंदाजाआधीच लोकसंख्यावाढ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -