घरताज्या घडामोडीLive Update: राज्य सरकारकडून रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक

Live Update: राज्य सरकारकडून रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक

Subscribe

राज्य सरकारकडून रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून उद्या त्या उद्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरू झाली आहे. नुकतेच शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत.

- Advertisement -

नागपूरमधील मेट्रोचा निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुलाच्या संबंधित अधिकाऱ्याने राजीनाम द्यावा अशी मागणी करत आंदोलन केले जात आहे.


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसह दोन जणांच्या जामीन अर्जावर आज दुपारी २.४५ वाजता सुनावणी होणार आहे.

- Advertisement -


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. सविस्तर वाचा 


शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे आजही भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार नसून आणखीन १५ दिवसांची वेळ मागितली आहे.


देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत आज वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १४ हजार ६२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १९७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार ४४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ४१ लाख ८ हजार ९९६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ६५१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ४१ लाख ८ हजार ९९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ७८ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख ३६ हजार १४२ जणांचा लसीकरण पार पडले. आतापर्यंत देशात ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ जणांचा लसीकरण पूर्ण झाले आहे.


आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तराखंडला दौरा करणार आहेत. यावेळी बैठक घेऊन उत्तराखंडमधील परिस्थितीचा आढावा गृहमंत्री घेणार आहेत. तसेच उद्या ते उत्तराखंडमध्ये हवाई सर्वेक्षण करणार आहेत.


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनवाणी होणार आहे. आर्यनला बेल की पुन्हा जेल? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. गेल्या १७ दिवसांपासून आर्यन जेलमध्ये आहे.


शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. भावना गवळी यांना ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी चौकशीला हजर राहण्यासाठी आणखीन १५ दिवसांची मुदत मागितली होती. ते १५ दिवस आता संपले असून ईडीकडून आता समन्स बजावण्यात आला आहे. भावना गवळी यांचे स्वीय सहाय्यकला अटक करण्यात आली आहे.


नागपूरमधील मेट्रोचा निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. नागपुरच्या पारडी भागात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -