Corona Update : मे महिन्याची सुरुवात देशासाठी चिंताजनक, रुग्णसंख्या गाठणार ४ लाखांचा टप्पा, तज्ञांचा दावा

१४ मे ते १८ मे दरम्यान देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३८ ते ४८ लाखांपर्यंत जाऊ शकते

india corona
india corona

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यातच देशात ऑक्सिजन,आणि बेड्सचीही कमतरता भासत आहे. देशात २४ तासात ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मात्र हा ताण आणखी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील ३-४ आठवडे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तर येत्या मे महिन्यात आणखी चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याचे देखिल म्हटले जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशातील कोरोना रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक होणार असल्याचे सांगितले जात आहे. मे महिन्यात कोरोनाचे पीक येणार असल्याचे आयआयटीच्या शास्रज्ञांनी सांगितले आहे.

आयआयटीच्या शास्रज्ञांनी कोरोच्या रुग्णसंख्येचा गणिती मॉडेलचा वापर करुन अभ्यास केला. या अभ्यासानुसार त्यांनी देशात कोरोना रुग्ण आणि त्यांच्या वाढीच्या वेळेचा अंदाज वर्तवला आहे. आयआयटी कानपूर येथील मणींद्र अग्रवाल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यचे गणितीय सूत्रांच्या आधारे अभ्यास केला. त्यानुसार, १४ मे ते १८ मे दरम्यान देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३८ ते ४८ लाखांपर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे पुढील दहा दिवसात देशात कोरोनाबाधितांची संख्या ४.४ लाखांपर्यत जाऊ शकते.


देशातील बाधितांचा आकडा दर २४ तासाला वाढत आहे. आज देशात ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ हजार ८१२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. शास्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजाचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. देशातील रुग्णसंख्येने आजच्या तारखेपर्यंत साडेतीन लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात शास्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ४ लाखांहून अधिक होण्यास वेळ लागणार नाही.


हेही वाचा – Covid 19 Test: लक्षणे असूनही Corona चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? महत्वाची ५ कारणे