Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दहा राज्यात कोरोनाचा प्रकोप; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

दहा राज्यात कोरोनाचा प्रकोप; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

Related Story

- Advertisement -

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या चार दिवसात कोरोनावर उपचार करणार्‍यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, ओडिसा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेतली. तसेच कोरोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

मागच्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थिती आणखी बिकट होईल, असे सांगण्यात आले आहे. दहा राज्यातील ८० टक्के कोरोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यावर राज्य सरकार जोर देत आहे. या जिल्ह्यातील लसीकरण वेगाने केले जाते आहे. तसेच या भागातील सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. केरळमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम पाठवली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ४४ हजार २३० इतका होता. त्यासोबतच देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.

- Advertisement -