गेल्या २४ तासांत भारतात २० हजारांहून नवे कोरोना रुग्ण, मृतांची संख्या घटली

Is the new variant of Corona 'NeoCov' dangerous? Find out what the experts say

जगभरात कोरोनाचे रुग्ण (New Corona Patient in India) वाढत असले तरीही भारतात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत २० हजार २७९ नवे बाधित कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर १८ हजार १४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, ३६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. शनिवारी भारतात २१ हजार ४११ नवे रुग्ण सापडले आहेत. (Corona update from India)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण नियमित वाढत असल्याने सक्रीय रुग्णांमध्येही वाढ होत आहे. सध्या भारतात १ लाख ५२ हजार २०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ५ लाख २६ हजार ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत ४ कोटी ३२ लाख १० हजार ५२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शिवाय, २०१९९३३४५३ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

हेही वाचा – अमेरिकेसह युरोपीय देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, जाणून घ्या रोगाचा प्रवास

सलग चौथ्या दिवशी सापडले २० हजारांहून अधिक रुग्ण

गेल्या चार दिवसांपासून देशात २० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. २१ जुलै रोजी देशात २१ हजार ५६६ रुग्ण सापडले होते. तर, २२ जुलै रोजी २१ हजार ८८० रुग्ण, २३ जुलै रोजी २१ हजार ४११ रुग्ण आणि आज २० हजार २७९ कोरोना रुग्ण सापडले आहेत. शनिवारी ६७ रुग्णांनी उपचारादरम्यान जीव गमावला होता तर, आज आलेल्या आकडेवारीनुसार ३६ लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.