Live Update : महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपली

Maharashtra Breaking News

महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मल्लिकार्जून खर्गे यांनी आमदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

राज्यसभेच्या चारही जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऱाष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि खर्गेंनी आमदारांना दिल्या सूचना

आपली एकजूट दाखवा

मतदान करताना काळजी घ्या, मविआच्या जागा जिंकूण आणा – शरद पवार


सर्वांना एकीचे आवाहन केलं आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास दिला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


महाविकास आघाडीच्या बैठकीला १२ अपक्ष आमदार उपस्थित


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सुरु

महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सुरु, राज्यसभेसाठी रणनिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे उपस्थित


महाविकास आघाडीच्या बैठकीला ९ अपक्ष आमदार उपस्थित

किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, संजय शिंदे, गीता जैन, मंजुळा गावित बैठकीला उपस्थित

आशिष जयस्वाल, विनोद अग्रवाल उपस्थित

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित


मुख्यंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार ट्रायडंटमध्ये दाखल

राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु


बहुजन विकास आघाडीच्या आमदारांना निमंत्रण नाही

बहूजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

तीन आमदारांना महाविकास आघाडीकडून निमंत्रण नाही

 


महाविकास आघाडीचे आमदार ट्रायडंटमध्ये जमण्यासाठी सुरुवात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ट्रायडंटमध्ये दाखल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल
थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार ट्रायडंटमध्ये दाखल


शिवसेना आमदारांना हॉटेल रिट्रिटमधून ट्रायडंटमध्ये हलवलं


बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या १ वाजता निकाल पाहता येणार

या लिंकवर https://www.mahahsscboard.in/ पाहता येईल निकाल

१२ वीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता


काँग्रेस नेते राहुल गांधी चंदीगडमध्ये दाखल, सिद्धू मूसावाला यांच्या कुटुंबियांची घेणार भेट


सेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवींचं नाव


योग्य तो निर्णय नक्की घेतील – उदय सामंत

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील – उदय सामंत

आम्ही सगळे एकत्र राहू असं मला वाटतंय. उद्धव ठाकरे हे सगळे निर्णय घेत असतात – उदय सामंत

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. त्या सभेत त्या काय बोलणार हे मला माहित नाही – उदय सामंत

संभाजी नगरची सभा ही अति विराट होईल – उदय सामंत


महाविकास आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे करणार मार्गदर्शन