घरताज्या घडामोडीCOVID 19 India: देशात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट; आरोग्य मंत्रालयाने सांगितले, तिसरी...

COVID 19 India: देशात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट; आरोग्य मंत्रालयाने सांगितले, तिसरी लाट कशी नियंत्रणात आली?

Subscribe

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सध्याच्या देशातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. ज्यामध्ये सांगितले गेले की, जगातील बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. १० देशांमध्ये ५६.४२ टक्के नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. परंतु भारतात आता कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा परिणाम झाला कमी

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, जगात आताही दररोज १५ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. आपण वेगाने लसीकरण करून तिसऱ्या लाटेत कोरोनाचा परिणाम खूप केला आहे. दुसऱ्या लाटेत लसीचा पहिल्या डोस घेण्याचे प्रमाण १० टक्के होते, तर जेव्हा तिसरी लाट आली तेव्हा ९० टक्क्यांहून जास्त लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळे वेगाने लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिल. कोरोनापासून बचाव करणे अजूनही आवश्यक आहे.

- Advertisement -

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट दिलासादायक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार ११७ दिवस होता, तर तिसरी लाट फक्त ४२ दिवस होती. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये २ लाख ५२ हजार मृत्यू झाले होते, तर तिसऱ्या लाटेमध्ये २७ हजाराच्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, कोरोना केसेसमध्ये आता वेगाने घट होत आहे. देशात एका आठवड्यात ११००० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जगातील कोरोना केसेसकडे पाहिले तर भारतात फक्त ०.७ टक्के कोरोना केसेस आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात आता ७७,१५२ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ६,५६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा – India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा घटली; 6,561 नवे रुग्ण, 142 मृत्यू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -