घरCORONA UPDATECorona Update: दिलासादायक! देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक...

Corona Update: दिलासादायक! देशात २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक नोंद

Subscribe

नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढउतार

देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढउतार दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृतांची नोंद चार हजारांहून अधिक होत आहे. आज देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची अधिक नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४३ हजार १४४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ६२ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७९ हजार ५९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३७ लाख ४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात १७ कोटी ९२ लाख ९८ हजार ५८४ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, १३ मेपर्यंत ३१ कोटी १३ लाख २४ हजार १०० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल (गुरुवार) दिवसभरात १८ लाख ७५ हजार ५१५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात काल ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान काल ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.


हेही वाचा – गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -