Corona Update: देशात कोरोनाचा प्रकोप, रुग्णसंख्या दीड लाख पार, मात्र मृतांचा आकडा घटला

देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 वर पोहचली आहे. यामुळे दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 13.29 टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 45 लाख 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यं 4 लाख 83 हजार 936 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

corona update ndia reports 1,79,723 fresh cases & 146 deaths in the last 24 hours omicron patient cross
Corona Update: देशात कोरोनाचा प्रकोप, रुग्णसंख्या दीड लाख पार, मात्र मृतांचा आकडा घटला

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळतेय. यात रविवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे जवळपास सात महिन्यानंतर देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 146 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 वर पोहचली आहे. यामुळे दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 13.29 टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 45 लाख 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यं 4 लाख 83 हजार 936 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

याच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे 410 नवे रुग्ण आढळून आलेत.त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही 4033 वर पोहचली आहे. यातील 1552 रुग्ण बरे देखील झालेत. यात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे जवळपास 1216 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधित रुग्ण आहेत. तर मागोमाग राजस्थान, दिल्ली, गुजरातमध्ये ही ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढतेय.

कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. त्याचेही रुग्ण देशात झपाट्यानं वाढत आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४ हजार ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या असून त्याखालोखाल दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्ण आहेत.

ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला. जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, बालकांच्या लसीकरण वेगाने केले जावे अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत. आजपासून देशात बूस्टर डोस (Precaution Dose) देण्यात येत आहे. तसंच ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटाला लसीकरण सुरु करण्यात आले आहे.


ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण